महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांना हार्ट अॅटकचा धोका जास्त का?
पुरुषांना महिलांपेक्षा १० वर्ष आधी हार्ट अॅटकचा धोका
ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्नचा वयाच्या ५२ वर्षी हार्ट अॅटकमुळे मृत्यू झाला आहे. शेन वॉर्नच्या अचानक मृत्यूमुळे क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. कमी वयात हार्ट अॅटकमुळे मृत्यू होत असल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. हा त्रास पुरुषांमध्ये जास्त असल्याचे दिसून येत आहे. एका रिपोर्टनुसार, महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये हार्ट अॅटकचा धोका जास्त असतो. यूएएस सेंटर्स फॉस डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेशन (सीडीसी) ने रिपोर्टनुसार, ह्रदया संबधीच्या आजारांमुळे दर वर्षी सर्वात जास्त मृत्यू होतात.''
अमेरिकेमध्ये दरवर्षी साधारण ७ लाख ३५ हजार लोक हार्ट अॅटकचे बळी ठरतात. साधारण सव्वा पाच लोक पहिल्यांदाच हार्ट अॅटकचा सामना करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनचा दाव्यानुसार, ''महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये हार्ट अॅटकचा धोका जास्त असतो.'' वर्ष २०१६ मध्ये जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित नॉर्वेच्या ट्रोम्सोअभ्यासानुसार, ''वयाच्या काही टप्प्यामध्ये पुरुषांना हार्ट अॅटकचा धोका महिलांपेक्षा साधरण दुप्पट असतो.''
याबाबत जाणून घेण्यासाठी संशोधकांनी साधारण ३४००० पुरुष- महिलांच्या आरोग्याच्या स्थितीचे परिक्षण केले. तसेच १९७९ ते २०१२ पर्यंत हृदयविकाराचा झटका आलेल्या सुमारे 2,800 लोकांचे निरीक्षण केले. कोलोस्ट्रॉल लेव्हल, हाय ब्लड प्रेशर, मधूमेह, हाय बॉडी मास इंडेक्स आणि शारीरिक हालचालींकडे बारकाईने पाहिल्यानंतर, संशोधकांना असे आढळून आले की हे सर्व धोका असलेले घटक हृदयविकाराच्या झटक्यामध्ये मोठ्या जेंडर गॅप दर्शवत नाहीत. मग महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय?
जॉन होपकिंस सिकरॉन सेंटर फॉर दि प्रीव्हेंशन ऑप हार्ट डिसीजच्या क्लिनिकल रिसर्च डायरेक्टर मायकल जोसेफ ब्लाहा सांगतात की, ''महिलांच्या तुलनेमध्ये साधरण १० वर्षांपूर्वी हार्ट अॅटक येऊ शकतो. पुरुषांना वयाच्या ४५ वर्षापासून तर महिलांना वयाच्या ५५ वर्षांपासून हार्ट अॅटक होण्याचा धोका जास्त असतो.'' मॅनपॉजच्यापूर्वी महिलांना एथेरोस्क्लेरोसिसमुळे बचाव होतो. एथेरोस्क्लेरोसिस अशी स्थिती आहे ''जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक डिपॉझिट (फॅटी डिपॉझिट) जमा झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.''
क्लीवलँड क्लिनीकनुसार, मेनॉपॉजनंतर महिलांमध्ये अॅस्ट्रोजन हार्मोनचा पातळी कमी होण्यास सुरूवात होते. एक्सपर्टनुसार असे मानले जाते की, प्री-मेनॉपॉजल एस्ट्रोजन पातळीमुळे महिलांचा हार्ट अॅटकपासून बचाव होतो. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिला ४५ व्या वर्षाच्या वयामध्ये हार्ट अॅटकच्या बळी ठरत नाही. पण ट्रोम्स स्टडीमध्ये एस्ट्रोजनची थेअरीचा सपोर्ट करणारे पुरावे मिळाले नाही. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, ''मेनॉपॉज येईपर्यंत महिलांना हार्ट अॅटकचा धोका कमी असतो.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.