मुंबई : हल्ली प्रत्येक वैवाहिक नात्यात जितकी प्रेमाची गरज आहे तितकीच लैंगिकतेचीसुद्धा. लैंगिक जीवनाचे समाधान प्रत्येक जोडप्याला हवे असते. त्यातल्या एखाद्या जरी व्यक्तीकडून हवे तसे सुख मिळाले नाही तर त्याच्या आपल्या नात्यावर परिणाम होऊ लागतो.
लैंगिक जीवन सुखकर नसले की, आपल्या जोडीदाराचे मन दुसरीकडे वळू लागते पण तसेच याचा त्रास आपल्या पुढील जीवनावर देखील होऊ लागतो. पुरुषांमध्ये असणाऱ्या काही वाईट सवयींचा शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो.
जास्त ताण घेणे, चुकीचे खाणे आणि चुकीची जीवनशैली यामुळे तुमची प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुमच्या सेक्स ड्राईव्हमध्ये काही समस्या असेल तर त्यामागे काही सवयी असू शकतात.
या वाईट सवयींमुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते-
1. ताण घेणे-
तुम्हालाही बोलण्यातून ताण येतो का ? त्यामुळे सावध राहा कारण पुरुषांमध्ये तणावामुळे शुक्राणूंची संख्याही कमी होऊ शकते. पुरुषांमध्ये, चिंता आणि तणावामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे आजपासूनच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तणावापासून दूर राहा.
2. व्यायाम न करणे-
व्यायाम न केल्यामुळे तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. दुसरीकडे, लठ्ठपणामुळे, तुमच्या शुक्राणूंची गतिशीलता मंदावते. ज्याचा तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. म्हणूनच एका जागी बसण्याची सवय तुम्ही आजपासूनच सोडली पाहिजे तर दुसरीकडे पुरुषांनी रोज व्यायाम केला पाहिजे.
3. रात्री उशिरा झोपण्याची सवय -
रात्री उशिरा झोपल्यामुळे तणाव आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. तसेच रात्रीच्या वेळी जागरण केल्यामुळे मानसिक त्रास होतो आणि तुमची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. त्यामुळे रात्री उशिरा झोपण्याच्या सवयीपासून लांब रहा.
4. मद्यपानाची सवय -
दारू, तंबाखूचे सेवन पुरुषांसाठी घातक ठरू शकते. कारण अल्कोहोलच्या अतिसेवनाने टेस्टोस्टेरॉनवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या स्पर्म काउंटवरही त्याचा परिणाम होतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.