Sugar Symptoms In Men's: पुरुषांच्या शरीरात शुगर वाढल्यास दिसतात हे 3 वेगवेगळी लक्षणे, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

Sugar Symptoms In Men's: पुरूषांमध्ये मधुमेहाची कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया. मधुमेहाची वेळीच लक्षण ओळखून उपचार सुरू केल्यास आरोग्य निरोगी ठेवता येते.
Sugar Symptoms In Men's:
Sugar Symptoms In Men's:Sakal
Updated on

Sugar Symptoms In Men's: आजकालच्या काळात मधुमेहाची समस्या वाढत चालली आहे. मधुमेह हा आजार कोणालाही होऊ शकतो. पण पुरूषांमध्ये मधुमेह आढळल्यास इरेक्टाइल डिसफंक्शन, स्नायू कमी होणे यासारखे अनेक लक्षणे दिसतात. द हेल्थ साईला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पुरूषांमध्ये मधुमेहाची कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.

पुरुषांमध्ये मधुमेह झाल्यास पुढील लक्षणे दिसतात

इरेक्टाइल डिसफंक्शन

मधुमेह असलेल्या सुमारे 75 टक्के लोकांना इरेक्शन होण्यात किंवा टिकवून ठेवण्यात अडचण येते. इरेक्टाइल प्रक्रियेसाठी नसा आणि रक्तवाहिन्या महत्त्वाच्या असतात. या प्रणालींना होणारे नुकसान लिंगाच्या कार्यावर परिणाम करू शकते.

जननेंद्रियाच्या थ्रशची समस्या

पुरुषांना वारंवार जननेंद्रियाच्या थ्रशच्या समस्येचा अनुभव येऊ शकतो, जो एक बुरशीजन्य यीस्ट संसर्ग आहे. त्यामुळे रक्तातील अतिरिक्त साखर लघवीत बाहेर पडते. यीस्ट साखरेवर वाढतो आणि मधुमेह असलेल्या पुरुषाच्या लिंगावर वाढण्याची शक्यता जास्त असते. जननेंद्रियाच्या थ्रशच्या बाबतीत, लिंगाच्या वरच्या भागात सूज, लालसरपणा आणि खाज सुटण्याची भावना असते.

Sugar Symptoms In Men's:
Men's Health Care: पुरूषांना उच्च रक्तदाबाचा अधिक त्रास; आरोग्य विभागाचे सर्वेक्षणातून माहिती आली समोर

स्नायू कमी होणे

रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार वाढल्यामुळे शरीरात ऊर्जेसाठी स्नायू आणि चरबी कमी होऊ लागते. टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त पुरुषांमध्ये हे अधिक सामान्य आहे आणि परिणामी त्यांची शक्ती कमी होते आणि स्नायू कमकुवत होतात.

याशिवाय शुगर वाढल्यास पुढील सामान्य लक्षणे दिसतात

  • घसा कोरडा होणे

  • वारंवार तहान लागणे

  • सारखी लघवी होणे

वरील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.