Menstrual Cup : प्रायव्हेट पार्टमध्ये अडकू शकतो मेनस्ट्रूअल कप, पेन-पेन्सिलचा वापर धोकादायक

हा कप योनीच्या आत घातला जात असल्याने याच्या स्वच्छतेची काळजी घेणं फार आवश्यक असतं.
Menstrual Cup
Menstrual Cupesakal
Updated on

Menstrual Cup IF Stucked in Private Part : पाळीच्या काळात प्रत्येक महिला कंफर्टेबल राहण्याचा प्रयत्न करते. अशावेळी आजकाल प्रत्येक जण मेंस्ट्रुअल कप वापरण्याचा सल्ला देतात.

पण कोणाचा सल्ला म्हणून कप वापरण्या ऐवजी त्याचे फायदे, तोटे आधी समजून घेणं आवश्यक आहे. हा कप योनीच्या आत घातला जात असल्याने याच्या स्वच्छतेची काळजी घेणं फार आवश्यक असतं.

काही वेळा योग्यरित्या कप वापरला न गेल्यानं कप आत फसण्याची शक्यता असते. अशावेळी काय करावं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Menstrual Cup
Menstrual Cup esakal
  • कप आत फसणं फार धोकादायक आहे.

  • कप नीट स्वच्छ नाही केला किंवा फसला तर इंफेक्शन होण्याची शक्यता फार असते.

  • पूर्ण योग्य माहिती नसल्याने काही महिलांना ते बाहेर काढण्यास पण फार त्रास होतो.

  • कप काढण्यासाठी काही महिला पेन, पेन्सिल सारख्या गोष्टी वापरतात. पण हे धोकादायक आहे.

  • यामुळे कपला आणि योनीच्या आतल्या पातळ, नाजूक त्वचेला स्क्रॅच पडण्याची दाट शक्यता असते.

  • यातूनच बॅक्टेरीयल इन्फेक्शन होतं.

  • अशावेळी घरच्या घरी कोणतेही अघोरी प्रयोग करण्याऐवजी सरळ स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटावं.

फोर्सफूली कप काढल्याने होतात 'हे' प्रॉब्लेम

  • बॅक्टेरियल इंफेक्शन

  • टॉसिक शॉक सिंड्रोम

  • डिस्चार्ज

मेंस्ट्रुअल कप वापरण्याआधी हे वाचा

  1. कप ६ ते १२ तासच वापरावा

  2. उशीर झाला तर फ्लो लीक होण्याची शक्यता असते.

  3. कप काढण्या आधी हात स्वच्छ धुवा.

  4. पहिलं बोट आणि अंगठ्याच्या मदतीने आरामात काढा.

  5. बोटाने थोडंसं दाबून आधी सील ओपन होऊ द्या मग बाहेर काढा.

  6. जबरदस्ती ओढू नका.

  7. कप काढाण्यासाठी चुकूनही पेंसिल, पेन सारख्या वस्तू वापरू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.