Tampon And Hygiene: टॅम्पूनचा आकार कसा असावा? हातांची स्वच्छता कशी ठेवावी? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर

Tampon And Hygiene: मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या टॅम्पूनबद्दल अनेक महिलांच्या मनात गैरसमज असतो. हा गैरसमज दूर करण्यासाठी पुढील बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
Tampon And Hygiene:
Tampon And Hygiene: Sakal
Updated on

Tampon And Hygiene: मासिक पाळी येणे ही एख नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक महिन्यात महिलांना या समस्येला सामोरे जावे लागते. मासिकपाळीत अनेक महिलांना पोटदुखी, क्रॅमप येणे, मळमळ होणे, पोट फुगणे यासारख्या गोष्टींचा त्रास होतो. मासिकपाळीत अनेक महिलांना खुप त्रास होतो. अनेक महिला सॅनिटरी पॅडचा वापर करतात. पण कधीकधी प्रवाह जास्त असल्याने कपड्यांवर डाग किंवा गळतीची भीती वाटते. अशावेळी महिला टॅम्पूनचा वापर करू शकतात. हाताच्या बोटांच्या लांबीचा टॅम्पून प्रवाह शोषण्याची क्षमता असते. परंतु महिलांना टॅम्पूनबद्दल अनेक गैरसमज असतात. त्यामुळे याचा वापर करणे टाळतात. हेल्थ शॉट्सने दिलेल्या वृत्तात टॅम्पून वापराशी संबंधित या सर्व गैरसमज दूर केले आहेत.

टॅम्पूनबद्दल महिलांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे

टॅम्पून सुरक्षित आहेत का?

यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननुसार, टॉक्सिक शॉक सिंड्रोम किंवा टॉक्सिक शॉक सिंड्रोम किंवा टीएसएस हा एक दुर्मिळ आजार आहे. जो शरीरात जीवाणूंद्वारे तयार केलल्या विषारी पदार्थांमुळे वाढू लागतो. या विकारामुळे मूत्रपिंड, हृदयासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात. एकच टॅम्पून दिर्घकाळ वापरल्यास योनीमध्ये संसर्ग होऊ शकतो.

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते टॅम्पूनचा वापर रक्तप्रवाहावर अवलंबून असतो. पण टॅम्पून दीर्घकाळ योनीत ठेवल्याने दुर्गंध येतो. याशिवाय डिस्चार्जची समस्या वाढते. योनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी टॅम्पून घालण्यापासून ते काढून टाकेपर्यंत स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

टॅम्पून आकार

जर तुम्ही पहिल्यांदा टॅम्पून वापर असाल तर रक्तप्रवाहानुसार लहान आकाराचे टॅम्पून वापरावे. टॅम्पून ५ आकारांमध्ये मिळतात. लाइट आणि हलके टॅम्पून घालणे आणि काढणे सोपे आहे.

कितीवेळा बदलावे

संसर्ग टाळण्यासाठी ६ ते ७ तासंनी टॅम्पून बदलावे. यामुळे योनीमार्ग स्वच्छ राहील. याशिवाय अनेक आजार दूर राहतील. ८ तासांपेक्षा जास्त वेळ एकच टॅम्पून वापरणे टाळावे. तसेच रक्तप्रवाहानुसार टॅम्पूनचा वापर करावा.

Tampon And Hygiene:
Corona New XEC Variant: कोरोनाचा नवा प्रकार 'XEC' झपाट्याने वाढतोय, जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

हाताची स्वच्छता

टॅम्पून घातल्यानंतर आणि काढून टाकल्यानंतर हात स्वच्छ पाण्याने किंवा हॅडवॉशने धुवा. यामुळे टॅम्पनसह बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो. टॅम्पून वापरण्यापूर्वी पॅकेटवर लिहिलेली सर्व माहिती पूर्णपणे वाचावी. त्यानुसार शरीर योग्य स्थितीत ठेवताना टॅम्पून घालावे.

कोरडेपणा येऊ शकतो का?

योनीमध्ये जास्त वेळ टॅम्पून ठेवल्याने रक्त तर शोषले जातेच पण नैसर्गिक आर्द्रताही शोषली जाते. त्यात असलेल्या रसायनांचे प्रमाण, योनीमार्गाच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास खाज, जळजळ आणि कोरडेपणा येतो. ल्यूब्रिकेटिड टॅम्पून वापरावे.

लघवी करताना टॅम्पून बदलावा का?

जर लघवी करताना अस्वस्थ वाटत असेल तर टॅम्पून बदलू शकता. पण प्रत्येक वेळी बदलणे गरजेचे नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.