Mental Health Day : मानसिक आरोग्यासाठी मोबाईलपासून 'ब्रेकअप' आवश्यक

आजच्या काळात मोबाईल लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
Mobile
Mobile Sakal
Updated on

Mental Health Day : आजच्या काळात मोबाईल लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी झोपेतून डोळे चोळत आपल्यापैकी अनेकजण उठत नाही. तोच प्रत्येकाच्या हातात मोबाईलचा वापर केला जातो. आपल्यापैकी अनेकजण चॅटिंग, सर्फिंग तर, काहीजण कामानिमित्त झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करत असतात. त्यात मध्यंतरीच्या कोविडच्या काळात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आज जागतिक मेंटल डे असून, जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर, मोबाईलपासून रोज थोडा-थोडा वेळ ब्रेक घेणे आवश्यक आहे.

Mobile
World Mental Health Day : कोरोनानंतर मानसिक आजारांत 25 टक्‍यांपर्यंत वाढ

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लोकांमध्ये मोबाईल फोनच्या वाढत्या सवयीमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. विशेषत: लहान मुलांची मोबाइलशी वाढती जवळीक ही आरोग्य तज्ज्ञांनी अतिशय गंभीर बाब असल्याचे मानले आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्मार्टफोनचा अतिवापर यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्याचा धोका असतो. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होण्यापासून झोपेचे विकार होण्याचा धोका संभवतो. स्मार्टफोनमुळे अनेकजण तासंतास एकाच जागी बसून राहतात. जे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. सतत एकाच जागी बसून राहण्याऐवजी हा वेळ शाररिक हालचाली करण्यास घालवला तर, हृदयविकार, मधुमेह यांसारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका कमी होण्यास होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Mobile
Mental Health: टीनेजमधल्या 'या' चुकीच्या सवयींमुळे येईल डिप्रेशन; मुलांनो, वेळीच सावध व्हा!

झोपेच्या विकारांच्या वाढत्या समस्या

सेल फोनच्या अति वापरामुळे अनेकांना झोपेचे विकार जडले आहेत. अपुऱ्या झोपेमुळे शरीर कायम थकलेले असते. यामुळे कोणत्याच कामात मन लागत नाही. अभ्यासात असे दिसून आले आहे की, झोपेच्या आधी सेल फोन वापरल्याने निद्रानाशाचा धोका वाढतो. झोपेच्या कमतरतेमुळे हृदयविकार, मधुमेह आणि नैराश्य अशा अनेक गंभीर आजारांची लक्षणे वाढतात.

वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्या

वाढता मोबाईलचा वापर मानसिक मानसिक आरोग्यांचे कारण ठरत आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कॉग्नेटिव इमोशन रेग्युलेशन, निर्णयक्षमता, चिंता-तणाव आणि इतर विविध मानसिक समस्यांचा धोका वाढण्याचा धोका असतो. ज्या नागरिकांना सेल फोनचे व्यसन अधिक आहे, त्यांना इतरांच्या तुलनेत नैराश्याचा धोका जास्त असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.