Corporate World मध्ये 45% टक्के पुरुषांना मानसिक तणावाचा त्रास, महिलांचा आकडा त्याहूनही मोठा

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण तब्बल 48 टक्के असल्याचे दिसून येते
Mental Stress Issue
Mental Stress Issueesakal
Updated on

Mental Stress Issue : कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण तब्बल 48 टक्के असल्याचे दिसून येते. गांभीर्याची बाब म्हणजे यात महिलांची टक्केवारी जास्त असून त्यांची टक्केवारी सुमारे 56% टक्के असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

हे सर्वेक्षण एम पॉवर बिर्ला कंस्ट्रक्शनच्या पुढाकाराने करण्यात आले. यात तब्बल 8 वेगवेगळ्या क्षेत्रातील 8 शहरांतील 3000 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील एका शहरात मुंबईचा देखील समावेश आहे.

सर्वेक्षणातील 50 टक्के कर्मचाऱ्यांना मानसिक ताण असल्याचे कळले. कामाच्या ठिकाणी प्रेशर असल्यामुळे त्यांच्या प्रोडक्टिव्हिवर त्याचा परिणाम होतो. तसेच कोविडपासून घरून काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना आपण फार आयसोलेटेड झालो असल्याचे जाणवते. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी मानसिक तणावाबाबत सांगितले त्यांना पाठीच्या दुखण्याचाही त्रास असल्याचे त्यांनी सांगितले.

Mental Stress Issue
Mental Stress Issue

एम पॉवरच्या परवीन शेख यांच्या म्हणण्यानुसार, कोविडपूर्वी जेव्हा त्या वर्कशॉप ऑर्गनाइज करायच्या तेव्हा त्यांना अनेकदा मेंटल हेल्थ हे लेबल वापरावे लागत नसे. आम्ही त्यावेळी कर्मचाऱ्यांना त्याच्या वेलनेसबाबत सांगत होतो. मात्र कोविडनंतर ही परिस्थितीच संपूर्ण पालटली. आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मानसिक ताण वाढलेला आहे. आमच्या मानसिक आरोग्य हेल्पलाइनवर कॉल्ससुद्धा वाढलेत. (Stress)

Mental Stress Issue
Mental Health : अशांत अन् अस्थिर मनाला शांत कसं ठेवाल? आजच करून बघा हा उपाय

एम पॉवरचे मुख्य मानसोपचारतज्ज्ञ डॉ सपना बांगर यांनी सांगितले की, 10 पैकी नऊ कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांच्याकडे कर्क कल्चर मेंटेन नाही. पुढे त्या म्हणतात सुमारे 94 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीस्कर ठिकाणी काम करायची अपेक्षा आहे. तसेच त्यांच्या मानसिक तणावामागची कारणे म्हणजे त्यांच्या कामाच्या जागेत बदल आणि आर्थिक असुरक्षितता. (Mental Health)

Mental Stress Issue
Mental Health संबंधित समस्या असल्यास महिलांना जाणवतात ही लक्षणं, दूर्लक्ष कराल तर...

सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, 50% टक्के लोकांनी त्यांना आलेल्या मानसिक तणावामुळे दोन आठवडे सु्ट्टी घेतली होती. त्यामुळे आता सर्वेक्षणाचे ध्येये हे कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये मानसिक तणावाबाबत जागृकता निर्माण करत त्यांना कुठलीही भिती न बाळगता मानसिक त्रास झाल्यास सुट्टी मागण्याची हिंमत निर्माण करणे असेल असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.