Mental Health: 'मी लग्न करेन तर फक्त विराट कोहलीशी', या वेडेपणाला डॉक्टर काय म्हणतात?

काही मुली मी लग्न करेन तर फक्त विराट कोहलीशी अस म्हणत असतात. तेव्हा आपण हा वेडेपण म्हणतो. पण...
mental health Know What Is Parasocial Relationship Which Leads To A One Sided Relationship With A Celebrity
mental health Know What Is Parasocial Relationship Which Leads To A One Sided Relationship With A Celebrity
Updated on

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची व्याख्या एक वेगळीच आहे. प्रेम कधी ही कुणावर ही आणि कुठेही होऊ शकते. प्रेमाला कोणतीच सीमा नसते म्हणतात. जगभरात असे काही लोक आहेत ज्यांच्या जीव सेलेब्सवरही जडतो अन् ते वेगळ्या विश्वात वावरु लागता. त्यांच्याशी लग्नाची स्वप्ने पाहू लागतात. लग्न करेन तर याच्याशीच नाही तर नाही. असा हट्ट धरतात. अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर येत असतात. पण हे सेलेब्सवरचं प्रेम हे प्रेम असत का? की दुसरं काही? ( mental health Know What Is Parasocial Relationship Which Leads To A One Sided Relationship With A Celebrity )

मध्यंतरी अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या लग्नादरम्यान एक किस्सा घडला होता. एका महिलेने दावा केला होता की, ती ज्युनियर बच्चनसोबत आधीच वैवाहिक संबंधात होती. याचा अर्थ ही महिला अभिषेक बच्चनच्या प्रेमात वेडी होती. तर अनेक तरुणी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या प्रेमात असतात. यामधील काही मुली मी लग्न करेन तर फक्त विराट कोहलीशी अस म्हणत असतात. तेव्हा आपण हा वेडेपण म्हणतो. पण मेडिकल भाषेत याला पॅरासोशियल रिलेशनशिप म्हणतात.

mental health Know What Is Parasocial Relationship Which Leads To A One Sided Relationship With A Celebrity
Health Care News : 'थायरॉईड' नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे समावेश!

तर काय आहे पॅरासोशियल रिलेशनशिप ?

हे एक असे नाते आहे जे एखाद्या नेत्याशी, अभिनेता, अभिनेत्री किंवा प्रभावशाली व्यक्तीशी असू शकते. पण अशा रिलेशनशिपची कल्पना सेलिब्रिटींना नसते. हे एकतर्फी नाते आहे. बऱ्याच गोष्टीत, लोक स्वतःला काल्पनिक पात्रांशी देखील जोडतात. पौगंडावस्थेत या प्रकारचे नाते निर्माण होते.

mental health Know What Is Parasocial Relationship Which Leads To A One Sided Relationship With A Celebrity
Health: झोपताच मनात विचार येतात; 10 मिनिट करा Walking Meditation

हे नाते आहे की मानसिक आजार?

काही लोक याला मानसिक आजार मानतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर प्रेम होते. त्याला पाहता क्षणी मन आनंदी होते. त्याला पॅरासोशियल रिलेशनशिप म्हणतात. एखाद्याला पाहून तुम्हाला आनंद किंवा प्रेरणा वाटत असेल तर अशा प्रकारचे नाते काही वाईट नाही. पण जेव्हा तुम्हाला ते मिळवायचे असते तेव्हा ते नाते मानसिक समस्येत बदलू लागते.

mental health Know What Is Parasocial Relationship Which Leads To A One Sided Relationship With A Celebrity
Pets For Mental Health : घरात पाळीव प्राणी पाळल्याने मुलांचे मानसिक आरोग्य राहते मजबूत, जाणून घ्या 'हे' फायदे

अशा नात्यात समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा त्या एकतर्फी नात्यामुळे तुम्हाला नैराश्य, एकटेपणा जाणवू लागतो. यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.