Health: दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीराच्या 'या' ७ दिर्घगामी समस्याही होणार दूर

Milk And Dates
Milk And DatesSakal
Updated on

दररोज रात्री दुधासोबत खजूर खाल्याने आपल्या शरीराला त्याचे खूप फायदे होतात. खजूर हे इतर पदार्थांपेक्षा जास्त प्रोटीन इनटेक आपल्याला देते. रोज दुधाबरोबर खजूर खाल्ल्याने लैंगिक समस्या तर दूर होतातच पण शरीराच्या या ७ इतर दिर्गगामी समस्याही दूर होतात.

खजूर हे सेलेनियम, फास्फोरस, फ्लोरीन, कॅल्शियम, पोटॅशियम, तांबा, सल्फर, कोबाल्ट आणि आयरन यांचे तर, दूध हे कॅलरी, प्रोटीन, हेल्दी फॅट, कॅल्शियम, विटामिन डी, राइबोफ्लेविन (बी२), विटामिन बी१२, आणि पोटॅशियम यांसारख्या घटकांचे भंडार आहे.

Milk And Dates
Dhanteras Puja: कर्जमुक्त व्हायचंय? धनत्रयोदशीच्या दिवशी 'हे' उपाय करा

खजूरामध्ये शरीराचे सुरळीत सुरू ठेवण्यासाठीचे अनेक आवश्यक असे पोषक घटक आहेत. इतर पदार्थांच्या तुलनेत खजूरामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे प्रथिने आणि अमीनो ऍसिडचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. याशिवाय त्यात ए, सी आणि ई सह बी व्हिटॅमिन देखील आढळतात. दूध आणि खजूर एकत्र खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि अनेक आजार दूर होतात.

१. बळकट स्नायू

प्रोटीन हे शरीरासाठी खूप गरजेचं असतं. आणि दूध आणि खजूर या दोन्ही गोष्टी प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. खजूर आणि दुधात प्रोटिनचे प्रमाण लक्षणीय असते, त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने हाडांची घनता वाढते आणि स्नायूंचा विकास होतो.

२. लैंगिक आरोग्यामध्ये सुधारणा

मानसिक आणि शारीरिक आरोग्याप्रमाणेच चांगल्या आयुष्यासाठी लैंगिक आरोग्य देखील संतुलित असणं गरजेचं आहे. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी काही खजूर रात्री दुधात भिजवून ठेवा आणि मग ते दूध सकाळी प्या.

Milk And Dates
Power Nap Benefits : ऑफिसमधील 10 मिनिटांची डुलकी ठरेल आरोग्यदायी

३. एनर्जी वाढवण्यासाठी

खजूर हे सकाळचा उत्तम नाश्ता म्हणता येईल कारण याच्याच ग्लुकोज आणि फ्रक्टोज सारख्या पोषक घटक असतात. खजूर आणि दुधाचे सेवन केल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवत.

४. अशक्तपणासाठी सर्वोत्तम उपचार

खजूरामध्ये आयरन असते आणि आपल्या शरीरातला रक्ताचा पुरवठा जलद व्हावा यासाठी आयरन आपल्या मदत करत असत, जे अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. एक ग्लास कोमट दुधात फक्त 3 खजूर मिसळून प्यायल्याने याचा फायदा होईल.

५. पचनशक्ती वाढवण्यासाठी

पचनाशी संबंधित समस्या असलेल्या वृद्ध व्यक्तींना याचा अधिक फायदा होईल. खजूरामधील फायबर आपली पचनशक्ती वाढवते, आणि याच्या समस्यांपासून आपल्याला मुक्त करते.

६. स्मरणशक्ती मजबूत होते

दूध आणि खजूर खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारू शकते. याचे कारण असे की त्यात व्हिटॅमिन बी असते, जे तुमच्या संपूर्ण मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

७. सांधेदुखी दूर होईल

दुधामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम असते, जेव्हा त्यात खजूर मिसळले जाते तेव्हा त्याचे फायदे दुप्पट वाढतात. हाडांची घनता वाढवून, हे पेय सांधेदुखी कमी करण्यास मदत करू शकते. या व्यतिरिक्त, हे मिश्रण वजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे, जर तुम्ही बारीक असाल, तर हे मिश्रण तुमच्यासाठी जबरदस्त सिद्ध होऊ शकते.

Disclaimer: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. हे उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.