- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञमन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा !मन म्हणजे नक्की काय? हजारो वर्षांपासून माणसाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर कवी सुधीर मोघे यांनीही काव्यातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे..चोवीसशे वर्षांपूर्वी पतंजलींनी ‘योग’ हे परिपूर्ण शास्त्र म्हणून विकसित केलं. या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना वेगवेगळ्या ध्यानपद्धतींतून मन उलगडत गेलं. त्यापैकीच एक अनुपम असा ध्यानप्रकार म्हणजे एमएसआरटी (MSRT) ध्यान. म्हणजेच ‘माइंड साउंड रेझोनन्स टेक्निक’. मराठीत त्याचा अर्थ ‘मन ध्वनी अनुनाद तंत्र’.यात तोंडानं नाद निर्माण करून त्या आवाजांची पुनरावृत्ती मानसिक स्तरावर अनुभवायची असते. यामुळे संपूर्ण शरीरात अनुनाद निर्माण होतो. शरीरात प्रचंड प्रमाणात अंतर्गत ऊर्जा सुप्त अवस्थेत असते, ती यामुळे पुनरुज्जीवित होते..शरीरातल्या प्राणशक्तीचा विकास करण्यासाठी योग परंपरेनं निरनिराळे मंत्र विकसित केले. या मंत्राचं रहस्य एमएसआरटीमधून उलगडत जातं. इच्छाशक्ती, एकाग्रता, गाढ विश्रांती या क्षमता विकसित करण्यासाठी; तसंच एड्स, कर्करोगग्रस्तांसाठी हे ध्यान वरदान ठरलं आहे. या ध्यानातली ‘माइंड साउंड रेझोनन्स मेथड’ (MSRM) म्हणजे प्रगत योगतंत्र आहे.सकारात्मक आरोग्य, चांगली स्मरणशक्ती, सखोल विश्रांतीचं ध्येय साध्य करण्यासाठी ती उपयोगी पडते. हे प्रगत, मार्गदर्शित ध्यानतंत्र, संपूर्ण शरीरातला ‘अंतर्गत ध्वनी अनुनाद’ अनुभवून साधकाच्या ‘माइंड-बॉडी कॉम्प्लेक्स’ला खोल विश्रांतीच्या स्थितीत घेऊन जातं..‘रेझोनन्स’ ही निसर्गातली एक अतिशय सामर्थ्यवान अशी प्रक्रिया आहे. ती काही उदाहरणांतून समजून घेऊया.विज्ञान शिकताना, दोन मुलं एकसारख्या काचेच्या बाटल्या घेतात. एका मुलानं एक बाटली ओठाशी उभी धरून फुंकली म्हणजे आवाज निघतो. त्याचवेळी दुसऱ्या मुलाने काही अंतरावर दुसरी बाटली कानाला लावली, तर तसाच आवाज निघतो. दोन एकसारखे तंबोरे घेऊन एकाच्या तारा छेडल्या, तर दुसऱ्या तंबोऱ्यातूनही तसाच ध्वनी निघतो..युद्धाच्या इतिहासात एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एका गावात लष्कराचं संचलन चालू असताना सैनिक पुलावरून जात होते. एकसुरात, एका ध्येयानं प्रेरित झालेल्या सैनिकांच्या तालबद्ध संचलनाच्या प्रचंड शक्तीनं तो पूल कोसळला. त्यापूर्वी प्रचंड मोठ्या, अवजड लष्करी वाहनांनी आणि रणगाड्यांनीही तो पडला नव्हता.या प्रक्रियेला विज्ञानामधे ‘रेझोनन्स’ (समगतिस्पंदन) असं म्हणतात. दोन गोष्टींमधल्या स्पंदनांच्या एकरूपतेला, एकतानतेला वैज्ञानिक भाषेत ‘रेझोनन्स’ म्हणतात..मुक्ताईला मांडे भाजण्यासाठी कुणी मडकं देईना, म्हणून ज्ञानेश्वरांनी स्वत:च्या पाठीवर मांडे भाजले होते हे आपण वाचलं आहे. स्थिर विद्युत निर्माण होताना, विद्युत निर्माण करणाऱ्या वस्तूत उष्णता निर्माण होत नाही. ज्या वस्तू जवळ आहेत त्यात होत असते असं विज्ञान सांगतं. ज्ञानेश्वर हे महान योगी होते. त्यांनी याच शास्त्रीय तत्वाचा उपयोग केला असावा, असं काही अभ्यासकांचं मत आहे. हा कार्यकारण भाव न कळल्यामुळे तो चमत्कार वाटतो..ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी दिलेल्या उपमा वाचतानाही आपण थक्क होतो. सोळा वर्षांच्या या तेज:पुंज अविवाहित तरुणानं स्त्री, पुरुष, प्रणय, भुंगा, प्रेमप्रसंग अशा अनेक गोष्टींचं वर्णन केलंय. फुलांच्या मनातले भाव सांगितलेत. या व्यक्ती, वस्तू यांच्याशी त्यांनी स्वत:ची स्पंदगती जुळवल्यामुळे त्यावर इतकं अप्रतिम भाष्य करू शकले, असा निष्कर्ष काही ठिकाणी वाचायला मिळतो.रेझोनन्स या आधुनिक विज्ञानाच्या तत्त्वावर आधारलेलं प्राचीन योगशास्त्रातलं एमएसआरटी ध्यान करायचं कसं, हे पुढच्या भागात पाहूया!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.