Harnaaz Kaur Sandhu : हरनाजला झालेला सेलिअ‍ॅक आजार नेमका काय? वाचाल तर धक्काच बसेल...

100 पैकी एका व्यक्तीला हा आजार होतो. आज आपण याच आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
 Harnaaz Kaur Sandhu
Harnaaz Kaur Sandhu sakal
Updated on

Harnaaz Kaur Sandhu : मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधूला तिच्या वाढत्या वजनामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आले. तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली. यावर हरनाजनेच स्वत: वजन वाढण्यामागील कारण सांगितले.

हरनाजला सेलिअ‍ॅक नावाचा आजार आहे. ग्लूटेन गहू, बार्ली आणि मोहरीमध्ये असणाऱ्या प्रोटीनमुळे तिला अ‍ॅलर्जी होते. 100 पैकी एका व्यक्तीला हा आजार होतो. आज आपण याच आजाराविषयी जाणून घेणार आहोत. (Miss Universe 2021 Harnaaz Kaur Sandhu struggle with celiac disease read story)

सेलिअ‍ॅक आजार नेमका काय?

सेलिअ‍ॅक आजारात शरीर ग्लूटेन पचवू शकत नाही, त्यामुळे आतड्यांना नुकसान होतं. यामुळे थकवा येणे, अशक्तपणा येणे तर कधी वजन कमी होणे तर कधी शरीरावर सूज येणे असे गंभीर आजार होऊ शकतात. 

याशिवाय यावर योग्य आणि वेळेत उपचार न घेतल्यास वेळेवर सेलिअ‍ॅक टाइप 1 डायबिटीज आणि मल्टीपल क्लेरोसिस असे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात.

 Harnaaz Kaur Sandhu
Harnaaz Sandhu: मिस युनिव्हर्स म्हणून हरनाजचा शेवटचा रॅम्प वॉक; मुकुट घालण्यासाठी पोहचली अन्...

सेलिअ‍ॅक आजारांची लक्षणे

  • शरीरावर सुज येणे

  • थकवा जाणवणे

  • वजन कमी होणे

  • मळमळ, उलटी होणे

  • सतत पोट दुखणे

  • आतड्या दुखणे

  • खाज सुटणे, पुरळ येणे

  • डोकेदुखी किंवा रक्ताची कमतरता जाणवणे

 Harnaaz Kaur Sandhu
Miss Universe Harnaaz Kaur : 'अगं बाई मिस युनिव्हर्स ना तू?' एवढी कशी फुगलीस! हरनाजच्या वाढत्या वजनावर...

यावर उपाय म्हणून नेहमी ग्लुटेन मुक्त आहार घेणे आवश्यक आहे. ते त्यांच्या आहारात  फळे, भाज्या, मांस, चिकन, दुग्धजन्य पदार्थ वैगरे खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.