चालताफिरता मोबाइलवर बोलणे धोकादायक! जीवघेण्या आजारांना पडू शकता बळी

Mobile Phone Side Effects On Health मोबाइल फोन रेडिओफ्रिक्वेंसी लहरींच्या स्वरूपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतात. या लहरींच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्याने कर्करोगासह अनेक आजारांची लागण होऊ शकते.
Mobile Phone Side Effects On Health
Mobile Phone Side Effects On Health Sakal
Updated on

अनेकांना चालता-फिरता फोनवर बोलण्याची सवय असते. तुम्हाला देखील चालता-चालता फोनवर बोलण्याची सवय असेलच. हो ना? पण तुम्हाला माहीत आहे का की जे लोक चालताना फोनवर बोलतात त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण होण्याचा धोका जास्त असतो. हो तुम्ही जे वाचलंय ते अगदी बरोबर आहे. 

Mobile Phone Side Effects On Health
Nasya Therapy: मायग्रेन-डोकेदुखीपासून हवीय कायमची सुटका? घरच्या घरी करा रामबाण आयुर्वेदिक उपाय

जे लोक एका ठिकाणी उभे राहून बोलतात किंवा थांबून बोलतात, त्यांना या आजाराचा धोका कमी असतो. पण फिरताना मोबाइलवर बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. आता हे असे का होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर चला जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती...

तुम्हीही चालताफिरता मोबाइलवर बोलता?

जेव्हा आपण चालता-फिरता मोबाइलवर कोणाशी तरी बोलतो, तेव्हा या काळात आपला मोबाइल फोन सतत कनेक्टिव्हीटी सिग्नल शोधत असतो. यादरम्यान मोबाइल फोन सिग्नलला जोडला जातो किंवा सिग्नलपासून दूर होतो. यामुळेच फोनमधून उच्च पातळीचे रेडिएशन बाहेर पडतात, ज्यामुळे कर्करोगाची लागण होण्याचा धोका असतो. हेल्थ एक्सपर्टच्या मते, जास्त काळ रेडिएशनच्या संपर्कात राहिल्यास अनेक आजारांची लागण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Mobile Phone Side Effects On Health
Flesh Eating Bacteria: आता बॅक्टेरियाही खाऊ लागलेत अर्धकच्च मांस; हे बॅक्टेरिया किती असतात घातक?

कित्येक आजारांचा धोका होऊ शकतो निर्माण 

तज्ज्ञांच्या मते, मोबाइल फोन रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरींच्या स्वरूपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतात. या लहरींच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्याने कर्करोगासह अनेक आजार होऊ शकतात. एवढेच नव्हे तर अनेकवेळा मोबाइल हरवल्यामुळे रस्ते किंवा रेल्वे अपघातातही लोक बळी पडले आहेत. याशिवाय मोबाइलच्या स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो. एकूणच मोबाइल फोनमुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

मोबाइलमुळे आरोग्यावर होऊ शकतात हे वाईट परिणाम 

मोबाइलवर टाइमपास करण्याच्या नादात कित्येकांच्या झोपेवर दुष्परिणाम होत आहेत. परिणामी अपुऱ्या झोपेमुळे संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. मोबाइलच्या स्क्रीनमधून निळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतो, या प्रकाशामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीत अडथळे निर्माण होतात. चांगली झोप येण्यासाठी मेलाटोनिन हार्मोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()