Mobile Phone : मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. मोबाईलशिवाय माणूस जगू शकत नाही पण दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलेला हा मोबाईल किती सुरक्षित आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ज्या मोबाईल स्क्रीनवर आपण दिवसाच्या आठ तासापेक्षा जास्त वेळ घालवतो ती मोबाईल स्क्रीन जर पब्लिक टॉयलेटपेक्षाही घाण असेल तर...?
होय. हे खरंय. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. ममिना यांनी याविषयी सांगितले. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Mobile phones have more bacteria than public toilets are more harmful for the skin )
डॉ. ममिना म्हणाल्यात की ज्या पद्धतीने आपण मोबाईलचा वापर करतो, तो चुकीचा आहे. यामुळे स्कीनचे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यांच्या एका टिकटॉकच्या व्हिडीओमध्ये त्यांनी याविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. डॉ. ममिना यांना मिलिअन लोक टिकटॉकवर फॉलो करतात.
त्या व्हिडीओमध्ये सांगतात की मोबाईल फोन हा नेहमी बॅक्टेरीयाने घेरलेला असतो. एवढंच काय आपल्या मोबाईलची स्क्रीन पब्लिक टॉयलेटपेक्षाही घाण असते.
त्या पुढे म्हणतात की फोनचा नियमित वापर, फोनवर बोलत असताना चेहऱ्याला होणारा स्पर्श यामुळे त्वचेवर बॅक्टेरियाचा परिणाम होतो आणि याचमुळे पिंपल्ससारख्या समस्या उद्भवू शकतात.
यावर उपाय म्हणून डॉ. ममिना यांनी फोन कसा स्वच्छ ठेवायचा, याविषयी सांगितले. त्या म्हणतात की फोन सतत स्वच्छ ठेवावा आणि ओल्या स्वच्छ कपड्याने पुसावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.