Monkeypox RT-PCR : मंकीपॉक्सचे त्वरीत होणार निदान,भारतात लॉन्च झाली RT-CPR किट,CDSCO कडून मिळाली मान्यता!

Monkeypox RT-PCR : या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने मान्यता दिली आहे. लवकरच हे किट आरोग्यविभागाकडे सोपवण्यात येणार आहे.
Monkeypox RT-PCR
Monkeypox RT-PCResakal
Updated on

Monkeypox RT-PCR :

जगभरात भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्या मंकीपॉक्सचे रूग्ण वाढतच आहेत. मंकीपॉक्सबद्दल जनजागृती केली जात आहे. अशातच आता भारताने मोठी मजल मारली आहे.आपल्या देशात या गंभीर आजाराशी दोन हात करणारे RT-PCR  किट लॉन्च केले आहे.  

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या सर्व वातावरणात भारतीय संशोधकांनी शोधलेली RT-PCR किट आपल्याला दिलासा देणारी आहे. (Monkeypox RT-PCR)

Monkeypox RT-PCR
Monkeypox : मंकीपॉक्सला घाबरण्याची गरज नाही; फक्त 'ही' 6 लक्षणे आढळल्यास लगेचच घ्या उपचार

भारतीय संशोधकांनी शोधलेले हे किट वापरून मंकीपॉक्स आजाराचे निदान करता येणार आहे. या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने मान्यता दिली आहे. लवकरच हे किट आरोग्यविभागाकडे सोपवण्यात येणार आहे.

माहितीनुसार, आंध्र प्रदेश सरकारच्या संशोधकांच्या एका समुहाने RT-PCR किट बनवले आहे. ट्रांसएशिया डायग्नोस्टिकच्या मदतीने हे किट पूर्णत्वास आले आहे.

Monkeypox RT-PCR
Monkeypox : ९२ देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स; WHO चे महासंचालक लसीबद्दल म्हणाले...

या किटमुळे काय होईल

संशोधकांचे असे मत आहे की, RT-PCR किटमुळे मंकीपॉक्स सारख्या घातक व्हायरसचे निदान होणे सोपे होणार आहे. या किटला ErbaMDX या नावाने लॉन्च केले गेले आहे. या किटची किंमत किती आहे हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.या किटला सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडूनही मान्यता देण्यात आली आहे.  (Monkeypox RT-PCR)

Monkeypox RT-PCR
Monkeypox Outbreak | केरळमध्ये मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.(What is monkeypox?)

Monkeypox RT-PCR
Monkeypox outbreak : संभोगाचे जोडीदार कमी करा; WHO चा इशारा

मंकीपॉक्सची रुग्णाची लक्षणे –

  • शरीरावर अचानक पुरळ उठणे

  • सुजलेल्या लसिका ग्रंथी

  • ताप

  • डोकेदुखी

  • अंगदुखी

  • प्रचंड थकवा

  • घसा खवखवणे आणि खोकला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.