Monkeypox Virus : मंकीपॉक्स या विषाणूचा धोका जगभरात वाढला आहे. हा धोका लक्षात घेऊनच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरात हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच, मंकीपॉक्सला 'वैश्विक संकट' असे देखील जाहीर करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून हा आजार आफ्रिकन देशांमध्ये पसरत होता. आता या आजाराने डोके वर काढले असून, पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्स या आजाराची पहिली केस समोर आली आहे. भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे.