how to take care of children according Ayurveda: देशात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे कडक उन्हाच्या झळांपासून आराम मिळाला आहे. पण पावसाळा अनेक आजार देखील घेऊन येतो. अशात लहान मुलांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण बदलत्या वातावरणात लहान मुलं सहज आजारी पडण्याची शक्यता असते. बालरोगतज्ञ डॉ. शिल्पा कतरे यांनी आयुर्वेदानुसार पावसाळ्यात लहान मुलांना कोणते आजार होऊ शकतात आणि लहान मुलांची कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
बालरोगतज्ञ शिल्पा यांनी सांगितले की 'पावसाळ्यात पाण्यामुळे Respiratory system चे रोग उद्भवतात. जसे की Rhinitis, nasal congestion, Bronchial Asthma, Bronchopneumonia, common cold यासारखे आजार उद्भवतात.
साचलेल्या डबके कींवा पाण्यामुळे Vector Borne Disease , Malaria, Chikungunya, Dengue यासारखे आजार जास्त पसरतात.
पावसाळ्यात दुषित पदार्थ आणि पाणी प्यायल्यास - Typhoid, Diarrhea, Gastroenteritis , hepatitis A हे आजार होऊ शकतात.
पावसाळ्यात मुख्यत: लहान मुलांना प्राणवह स्त्रोत्रस म्हणजेच Respiratory System चे विकार होताना दिसतात. हे विकार होऊ नये म्हणून आयुर्वेदात 'वमन' कर्म मुख्यत:कफ विकार टाळण्यासाठी सांगितले आहेत. वमन कर्माचा समावेश पंचकर्मात होतो. यामध्ये मुखाद्वारे औषध घेऊन शरीरातील दोष हे मुखाद्वारेच बाहेर काढले जातात. हे कर्म पावसाळा सुरू होण्याच्या आधी म्हणजेच वसंत ऋतुत केले जाते.
* नाकाद्वारे नियमितप गाईचे तुप घ्यावे. यालाच 'नस्य विधी' असे आयुर्वेदात म्हणतात.
* 'सुवर्णप्राशन' म्हणजे सुवर्ण भस्म-मध-गोघ्रित यांनी तयार केलेले सुवर्णप्राशन प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर सेवन करावे. यामुळे बालकाची स्मृती, बुद्धी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.
* शतावरी कल्प, अश्वगंधा कल्प यांचे दुधासोबत रोज रात्री जेवण झाल्यावर सेवण करावे. यामुळे लहान मुलांची वाढ लवकर होते. तसेच लहान मुलं सुदृढ होतात.
यामध्ये दुध, ताक, दही यारख्या पदार्थांचा समावेश होतो. यामध्ये प्रोटीन, पोटॅशिअम,जीवनसत्वांनी समृद्ध असतात. यामुळे हाडं मजबुत होतात.
जीवनसत्वे ए, सी आणि कॅल्शिअम असते. पालक, मेथी, चवळी यासारख्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करू शकता.
पावसाळ्यात येणाऱ्या फळांचा आहारात समावेश करावा. सफरचंद, लिची,पीच, पपई यासारख्या फळांचे सेवन करू शकता.
रोजच्या आहारात मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक जीवनसत्वांचा समावेश असतो. तुम्ही मटकी, चणे, चवळी, हिरवा वाटाणा यांचा समावेश करू शकता.
गुळ आणि शेंगदाणे खाणे आरोग्यदायी असते. गुळ शेंगदाण्याचे लाडू, चिक्की यासारखे पदार्थ बनवून सेवन करू शकता. गुळ आणि शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक घटक रक्तशुद्ध करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
सुकामेव्यांमध्ये काजू, बदाम, अक्रोड,पिस्ता यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. यामध्ये असलेले पोषक घटक शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
पावसाळ्यात मांसाहार करणे टाळावे.
दिवसा झोपणे टाळावे.
थंडी वाजत असेल तर गरम उबदार कपड्यांचा वापर करावा.
जर सर्दी- खोकला असेल तर मुलांना शाळेमध्ये जाताना मास्कचा वापर करायला लावावा. तसेच बाहेर जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.