Monsoon Health Care: पावसाळ्यातील विषाणूजन्य आजारांमुळे शाळांमधील उपस्थितीवर परिणाम

पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्र पाण्याची डबकी साचल्यामुळे डासांची पैदास वाढलेली आहे. तसेच, पावसाळ्यात वातावरण बदलल्यामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पालकांसह शाळांकडून देखील खबरदारी घेतली जात आहे.
Monsoon Health Care
Monsoon Health CareSakal
Updated on

Monsoon Health Care: ‘पप्पा! दोन दिवस झाले माझा मित्र सोहम शाळेत येत नाही. परवा त्याला शाळेतच खूप ताप आल्याने मॅडमने घरी पाठवले. आज त्याच्या आईने मॅडमला फोन करून सांगितले की, सोहमला थंडीतापासह सर्दी, खोकला, जुलाब अशी लक्षणं आहेत. आजदेखील आमच्या वर्गातील दोन मुलांना ताप आल्यामुळे घरी पाठवून दिले. आमच्या शाळेतील अनेक मुलांना ताप, सर्दी, खोकला झालाय...’ असे संवाद मुलांकडून ऐकायला मिळत आहेत.

पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्र पाण्याची डबकी साचल्यामुळे डासांची पैदास वाढलेली आहे. तसेच, पावसाळ्यात वातावरण बदलल्यामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पालकांसह शाळांकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. मुले आजारी असल्यास शाळेत पाठवू नका, अशा सूचना पालकांना शाळांकडून देण्यात आल्या आहेत. परंतु, सध्या पावसाळा व वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी, शाळेत शिक्षकांसह विद्यार्थ्यांनादेखील थंडीताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, घशात खवखव होणे, पोट दुखणे असे त्रास जाणवत आहेत.

आहारात करा बदल

शासकीय व अनुदानित शाळांमधील मुलांना शालेय पोषण आहार दिला जातो. याअंतर्गत पुरविले जाणारे पदार्थ बहुतांश ठिकाणी सकाळी बनविले जातात. काही वेळा विद्यार्थी हे अन्न डब्यात ठेवून दुपारी खातात. पावसाळ्यात अन्न खराब होण्याची शक्यता असते. बंद डब्यात ठेवलेल्या या अन्नामुळे मुलांचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे बचत गटांनी खिचडी, भातासारखा शिजवलेला ओलसर पदार्थ देण्याऐवजी कोरडा आहार द्यावा, अशा सूचना शासनाने दिल्यास मुलांचे आरोग्य पावसाळ्यातदेखील चांगले राहू शकते.

Monsoon Health Care
Monsoon Care: पावसाळा आणि रोगप्रतिकार शक्ती

शाळांकडून आवाहन

सध्या मुले एकत्रितपणे एका स्कूल बस, व्हॅनमध्ये शाळेला येत-जात आहेत. त्यामुळे कोरोनाशी साधर्म्य असलेली लक्षणे मुलांमध्ये दिसत आहेत. मुले आजारी असल्यास पूर्ण बरे वाटेपर्यंत शाळेत पाठवू नका, तसेच पालकांनी मुलांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन शाळांकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.