Monsoon Health : देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे, विविध आजारांचा धोका संभवतो. या दिवसांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाचा सामना करावा लागतो.
या दिवसांमध्ये विषाणू, बॅक्टेरिआचे प्रमाण वाढल्यामुळे, आजारांचे प्रमाण वाढते. मुळात आपल्या सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती पावसाळ्यात कमकुवत होते. त्यामुळे, सगळ्यांना सर्दी-ताप खोकल्याचा संसर्ग होतो. परिणामी, या संसर्गाला दूर ठेवण्यासाठी आपण आहाराची खास काळजी घ्यायला हवी.
जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पेयांबद्दल सांगणार आहोत. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतील. कोणते आहेत हे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स? चला तर मग जाणून घेऊयात.
आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. आरोग्यासोबतच केस आणि त्वचेचे आरोग्य उत्तम प्रकारे राखण्यासाठी आवळा अतिशय लाभदायी मानला जातो. त्यामुळे, आहारात आवळ्याचा जरूर समावेश करावा.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्सचे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, आवळ्याचा रस किंवा आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि इतर संसर्गांपासून बचाव होतो.
पावसाळा सुरू झाला की, चहाचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. परंतु, साधा चहा पिण्यापेक्षा तुम्ही मध, आलं अन् लिंबाचा चहा नक्कीच पिऊ शकता. यामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होईल. तसेच, विविध आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकेल.
हा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात चहापावडर घाला. आता या मिश्रणाला उकळी आली की, त्यात आलं, लिंबाचा रस आणि मध मिसळा. आता या चहाला उकळी आली की, गॅस बंद करा आणि गरमागरम चहाचा आस्वाद घ्या.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.