बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री जान्हवी कपूरला फूड पॉयझन झालं होतं आणि त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं होतं. सध्या तिची प्रकती ठिक आहे. पण पावसाळ्यात ही समस्या अधिक निर्माण होत असते. अन्नातील विषबाधेने दरवर्षी अनेकजणांचा जीव सुद्धा जातो.
त्यामुळे पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देणं अधिक महत्त्वाचं असतं. पावसाळ्यात अन्नामध्ये हानिकारक बॅक्टेरियांमध्ये वाढ होतात. जे पोटात प्रवेश करतात, त्यामुळं फूड पॉयझनिंगचा धोका अधिक वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं तुम्हाला जर फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवली तर त्वरित आराम मिळविण्यासाठी काय केले पाहिजे जाणून घेऊयात. (Monsoon Health Home Remedies for Food Poisoning)
लिंबचे सेवन
एक चमचा लिंबाच्या रसामध्ये चिमूटभर साखर मिसळा. दिवसातून 2 ते 3 वेळा याचे सेवन करा. ज्यामुळे फूड पॉयझनिंगपासून तुम्हाला त्वरित सुटका मिळेल.
दह्याचे करा सेवन
एक चमचा दही घ्या. त्यात एक चमचा मेथीदाणे टाका. ते चांगले मिसळा. पण याचे सेवन करता ते चघळणार नाही याची विशेष काळजी घ्या. दही आणि मेथीचे मिश्रण पोटदुखी आणि उलटीच्या समस्येपासून आराम देते.
भाजलेले जिरे
भाजलेल्या जिऱ्याची पावडर तुम्ही सूपद्वारे सर्व्ह करु शकता. अस केल्यानं पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.
तुळशीची पाने
तुळस ही अनेक समस्येसाठी फायद्याची आहे. आणि हे सर्वश्रुत आहे. फूड पॉयझनिंग झाले असेल तर तुळशीच्या पानांचा रस घ्या. त्यात थोडे मध घाला. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि त्याचे सेवन करा पोटदुखीच्या समस्येपासून काही काळ आराम मिळू शकतो.
सफरचंद सायडर व्हिनेगर
हे देखील फूड पॉयझनिंगवर रामबाण उपाय आहे. एक कप गरम पाणी घ्या. त्यात 2 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. याचे सेवन केल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.