Monsoon Tea: पावसाळ्यात चहाची तल्लफही भागेल आणि आरोग्यही सुधारेल; या गोष्टी ट्राय करा!

घराघरात बनणारा दूधाचा चहा सतत पिणं शरीरासाठी अपायकारक मानलं जातं. पण मग त्याला पर्याय काय?
Tea in Rainy Season
Tea in Rainy SeasonSakal
Updated on

बाहेर धोधो कोसळणाऱ्या पावसात गरम चहा पिण्याची मजा काही औरच आहे. पावसाळ्यामध्ये अनेक जण चहा पिण्यासाठी फक्त निमित्तच शोधत असतात. एक नव्हे दोन नव्हे तर दिवसातून चार चार कप चहा पिणारेही काही चहाप्रेमी आपल्या ओळखीत असतील.

सामान्यपणे घराघरात दूधाचा चहा बनवला जातो. पाहुणे येऊ देत किंवा घरी रोजचा चहा असूदे, बहुतांश घरांमध्ये दूध, पाणी, चहापावडर, साखर आणि गरज पडल्यास आलं, वेलची टाकून चहा केला जातो. पण काही लोक असंही मानतात की, हा चहा पिणं शरीरासाठी धोकादायक आहे. यातून शरीराला अपाय होतो. (Health Tips)

पण चहावर असलेल्या प्रेमापायी अनेकांना चहा सोडणं कठीण होतं. अशा प्रकारे बनवलेला दूधाचा चहा पिल्याने अनेकांना गॅसची समस्याही होते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये दूधाचा चहा पिणं टाळलेलंच बरं. पण मग असा चहा टाळायचा तर कोणता चहा घ्यायचा? दूधाच्या चहाला योग्य पर्याय कोणता आहे? याच पर्यायांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चहामुळे अपाय होऊ नये यासाठी वेगळ्या पद्धतीचे चहा पिणं आवश्यक आहे. चहाच्या या प्रकारांमुळे तुमची रोगप्रतिकार शक्तीही वाढेल आणि चहा पिण्याची मजाही येईल. तसंच तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता.

Tea in Rainy Season
Cardamom Tea : वेलची चहा पिण्याचे आहे भरपूर फायदे, हार्टसोबतच शरीराला मिळतात एवढे फायदे

आल्याचा चहा

पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आल्याचा चहा पित असाल तर तुम्ही या वातावरणामुळे होणाऱ्या सिजनल फ्लू, खोकला, सर्दी यापासून वाचू शकता. तसंच पावसाळ्यात होणारी अपचनाची समस्याही टाळता येऊ शकते. शिवाय रक्ताभिसरणं सुधारणं, रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हेही या चहाचे काही फायदे आहेत.

Tea in Rainy Season
Green Tea Side Effects: ग्रीन टीचा जास्त वापर ठरू शकतो धोकादायक, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

कॅमोमाईल चहा

कॅमोमाईल या पदार्थामध्ये संसर्गापासून बचाव करण्याची शक्ती असते. तसंच अँटी मायक्रोबियल घटकही असतात. त्यामुळे जर तुम्ही हा कॅमोमाईल चहा पिलात तर तुम्हाला या वातावरणात होणारा फ्लू, सर्दी, तसंच व्हायरल आजारांपासून संरक्षण मिळतं. तसंच रोगप्रतिकार शक्ती वाढायलाही मदत होते.

Tea in Rainy Season
Tea Tips : चहानेही होतात दात पिवळे! म्हणून बनवा अशा खास पद्धतीने

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडेंट्स असतात. तसंच त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढते. यामुळे संसर्गजन्य आजारापासून संरक्षण मिळते. ग्रीन टी त्वचा आणि केसांचंही संरक्षण करण्यासाठी उपयुक्त असतो. हा चहा तुम्ही उपाशीपोटीही पिऊ शकता.

तुळशीचा चहा

जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये किंवा इतरही कोणत्या ऋतुमध्ये डोकेदुखी, सर्दी, खोकला जाणवतो. किंवा डिप्रेशन, डायबेटिस पासून बचाव करायचा असेल, तर तुळशीचा चहा अत्यंत गुणकारी आहे. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे शरीरातली कोणत्याही प्रकारची सूज कमी व्हायला मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.