Monsoon Water Drinking : पावसाळ्यात तुमच्या प्रकृतीनुसार किती पाणी प्यावे? जाणून घ्या

पावसाळ्यात सहाजिकच पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते.
Monsoon Water Drinking
Monsoon Water Drinkingesakal
Updated on

How Much Water Should Drink In Monsoon : पावसाळ्यात मुळातच तहान कमी लागत असल्याने सहाजिकच पाणी कमी प्यायलं जातं. पण निरोगी राहण्यासाठी पाणी पिणं फार महत्वाचं असतं. कारण पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊन शरीराशी, पचनाशी निगडीत अनेक समस्या निर्माण होतात.

पण तहानच लागत नाही तर पाणी कमीच प्यायला जातं, त्यामुळे पावसाळ्यात किती पाणी प्यावं जाणून घ्या. याचा संबंध आपल्या वात, कफ, पित्त प्रकृतीशीही असतो.

Monsoon Water Drinking
Monsoon Water Drinkingesakal

आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते हे आपल्याला माहित आहे. जेव्हा पाण्याची कमतरता होते तेव्हा डिहायड्रेशनमुळे पेशी संकुचित होतात आणि योग्यरित्या कार्य करत माहीत. त्यामुळे पेशींचे कार्य सुरळीत होण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते.

रुबी हॉल क्लिनीकच्या आहारतज्ज्ञ गायत्री ट्रकू यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, बदलत्या ऋतू बरोबर अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यापासून बचावासाठी पाणी मदत करू शकते. हे प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते. यकृत, पोट आणि किडनीशी संबंधित समस्या कमी होतात. त्यामुळे ऋतू कोणताही असला तरी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते.

Monsoon Water Drinking
Drinking Water: तुम्ही पण उभं राहून पाणी पिता का? मग आताच सावध व्हा, नाहीतर....
Monsoon Water Drinking
Monsoon Water Drinkingesakal

रोग प्रतिकारक शक्ती वाढते

स्वतःला हायड्रेट ठेवल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पुरेशा प्रमाणात पाणी घेतल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. काही पेये जे दिवसभर हायड्रेटेड आणि उर्जावान राहण्यासाठी पिऊ शकतात ते म्हणजे नाराळाचे पाणी, ओतलेले पाणी, स्मूदी, ओआरएस, ताक यासारख्या पदार्थांनी प्रोबायोटिक्स आतडे राखण्यास मदत करतात.

Monsoon Water Drinking
Drinking Water Rules: चाळीशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग पाणी पिण्याचे हे नियम नक्की फॉलो करा

शरीर प्रकृतीनुसार पावसाळ्यात किती पाणी प्यावं?

  • जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही शरीर थंड ठेवण्यासाठी रोज आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

  • जर तुम्हाला कफ असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या पाणी शोषून घेतात.

  • जर वात प्रकृती असेल आणि वाताचा त्रास होत असेल तर रोज तीन ते साडे तीन लीटर पाणी प्यावे. पाणी वात काढून टाकते. हे पित्त दोष संतुलीत करते आणि कफ वाढण्यास प्रतिबंध करते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.