- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ
चंद्र आणि सूर्य... सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामाजिक अशा अनेक पातळ्यांवर अढळ स्थान असणारे विषय. चंद्राला आपण दैवत मानतोच. त्याबरोबर कला, साहित्य, विज्ञान क्षेत्रातल्या प्रतिभावंताना तो भुरळ पाडत आला आहे. योगशास्त्र, ध्यानविद्येच्या अभ्यासकांनाही ‘चंद्रनाडी’, ‘सहस्त्रार चक्रातलं चंद्रामृत’ या संकल्पना नवीन नाहीत. यासाठीच नुकत्याच झालेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘चंद्र’ध्यान का, कसं करायचं, त्यामागचं अध्यात्म, विज्ञान समजून घेऊया.