Morning Coffee Disadvantages: सकाळी कॉफी प्यायची सवय आहे? ही सवय आजच घालवा कारण...

सकाळी सकाळी कॉफी पिणे तुमच्या शरीरासाठी किती घातक ठरू शकते याची कल्पना तुम्हाला आहे काय?
Morning Coffee Disadvantages
Morning Coffee Disadvantagesesakal
Updated on

Morning Health Care: असे अनेकजण असतील ज्यांची सकाळ चहाने होते. चहा पिल्याने झोप जाते आणि थकवा दूर होतो असाही अनेकांचा समज आहे. तसेच कॉफीचा एक घूट पिऊनदेखील अनेकांना थकवा गेल्याचा फिल येतो. मात्र सकाळी सकाळी कॉफी पिणे तुमच्या शरीरासाठी किती घातक ठरू शकते याची कल्पना तुम्हाला आहे काय?

रिकाम्या पोटी कॉफी का पिऊ नये?

अशी अनेक कारणे आहे ज्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे. विशेषत: महिलांनी रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नये. त्यामागचं कारण म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिल्याने शरीरातील कार्टिसोल हार्मोनची लेव्हल वाढते. ज्याने तुमच्या ओव्यूलेशन, वजन आणि हॉर्नोन्सवर वाईट परिणाम होतो. (Coffee)

सकाळी सकाळी स्ट्रेस हॉर्मोनची लेव्हल फार जास्त असते. अशा वेळी जेव्हा तुम्ही सकाळी कॉफीचं सेवन करता तेव्हा कार्टिसोल हार्मोनची लेव्हल कमी होण्याऐवजी आणखी वाढते. (Health News)

हा हार्मोन शरीरासाठी चांगला मानला जातो. मात्र सकाळी स्ट्रेस लेव्हल जास्त असल्याने तुमच्या बॉडीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. तुमचं ब्लड शुगर लेव्हलही वाढायला लागते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Morning Coffee Disadvantages
Hot vs Cold Coffee : गरम की थंड, तुमच्या आरोग्यासाठी कोणती कॉफी फायदेशीर

कॉफीऐवजी सकाळी रिकाम्या पोटी काय प्यावे?

सकाळी उठून उपाशी पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेदायी ठरते. रात्रभर आपण झोपले असल्याने पाणी पित नाही. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. म्हणून सकाळी उठून दोन ते तीस ग्लास पाणी प्यावे. तुम्हाला सकाळी उठून पाणी पिण्याची सवय असेल तर त्यात थोड लिंबूही घाला. याने तुमचं वजन कमी होण्यासही मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.