Morning Drink : मॉर्निंग वॉकनंतर ज्युस पिणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

काही लोकांना मॉर्निंग वॉक केल्यानंतर ज्यूस पिण्याची सवय असते. पण ते कितपत योग्य?
Morning Juice
Morning Juiceesakal
Updated on

Drinking Juice After Morning Walk Side Effects : सकाळी चालण्यास जाणे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि बॉडी हेल्दी राहते. पण काही लोकांना सवय असते की, वॉक झाल्यानंतर १-२ ग्लास ज्यूस पितात. त्यांना वाटते की, ज्यूसमुळे सगळं ठिक होऊन जाईल. पण मॉर्निंग वॉकनंतर रोज ज्यूस पिणे खरच योग्य आहे का?

Morning Juice
Morning Juiceesakal

बहुतांशवेळा हे फ्रूट ज्यूस असतात. त्यातील रस काढून बाकी फेकून देतात. यामुळे फळांमधले फायबर आणि काही मायक्रोन्युट्रीएंट्स निघून जातात. त्यामुळे प्रश्न पडतो की, हे ज्यूस घेतल्याने कितपत फायदा होतो? याविषयी न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार बंगळूरूचे क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका राहतगी यांनी काही फॅक्ट्स मांडले आहेत.

डायबेटीस पेशंट्सची यामुळे शुगर वाढते

जेव्हा पल्प काढून बाकी फेकून दिले जाते तेव्हा त्या फळातील फायबर आणि इतर मायक्रोन्युट्रिएंट्स पण फेकून दिले जातात. शिवाय फळातील फ्रुक्टोजचे प्रमाण वाढते. या शुगर मुळे जास्त ज्यूस पिणाऱ्यांमध्ये डायबेडिस प्रॉब्लेम सुरु होण्याची शक्यता असते. त्यांनी सांगितलं की, ज्यूसमध्ये जास्त कॅलरीज असतात. साधारण एक कप ज्यूसमध्ये ११७ कॅलरीज असतात. त्यामुळे जास्त ज्यूस पिण्याचाही बऱ्याच गोष्टींवर वाईट परिणाम होतो.

Morning Juice
Barefoot Walk Benefits : अनवाणी चालण्याचे हे फायदे माहितीयेत?
Morning Juice
Morning Juiceesakal

सकाळ-सकाळी ज्यूस पिणे योग्य नाही

डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितलं की, मॉर्निंग वॉकनंतर ज्यूस न घेण्याचे अनेक कारणे आहेत. सकाळी वॉकला जाण्या आधी आणि नंतर आपले पोट रिकामे असते. काही ज्यूस हे अॅसिडीक असतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस घेतल्याने अॅसिडीटी वाढू शकते. तसंही रिकाम्या पोटी ज्यूस पिणे योग्य नाहीच. जर सकाळी ज्यूस घेतला तर शरीरातली शुगर लेव्हल दिवसभर वाढलेली राहते.

Morning Juice
Morning Walk : पावसामुळे मॉर्निंग वॉक होत नाही? हे घ्या बेस्ट ऑप्शन
Morning Juice
Morning Juiceesakal

गॅस्ट्रीक रुग्णांना नुकसान

ज्यांना गॅस्ट्रीक समस्या आहेत त्यांच्यासाठी ज्यूस घेणे नुकसानकारक असते. ज्यूस बनवताना फायबर काढून टाकले जाते. फायबर पचनासाठी फार आवश्यक असते. फायबर निघून गेल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतीत. यामुळे गॅस बनू लागतो. त्यामुळे हे गॅस्ट्रीक रुग्णांसाठी हे नुकसानकारक आहे.

मुतखड्याचा धोका

काही लोक मॉर्निंग वॉकनंतर हिरव्या पालेभाज्या, बीट, पालक, संत्र असं बरच काही मिक्स करून त्याची स्मूदी पितात. हे मिक्स फ्रुट ज्यूसचे डेडली कॉम्बिनेशन आहे. कारण फ्रूटमध्ये फार जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी होतं. तर दुसरीकडे पालकसारख्या भाजीत ऑक्जेलिक अॅसिड असते. ऑक्जिलेट जास्त तयार झाल्याने किडनी डॅमेजचा धोका संभवतो. यामुळेच ऑक्जिलेटला पटकन सोशून घेण्यासाठी व्हिटॅमीन सीची आवश्यकता असते. त्यामुळे फळांचा रस मिक्स केला जातो.

Morning Juice
Walking Benefits : Morning Walk केल्याने खरंच काही फायदा होतो का?

जेव्हा पोटात ऑक्सीलेटचे प्रमाण वाढते तेव्हा ते लहान लहान क्रिस्टलच्या रुपात किडनीत जमा होते. हे क्रिस्टस किडनीत जाऊन किडनी फंक्शनला खराब करते. एका लीव्हर रोग तज्ज्ञ डॉ ए बी फिलीप्स यांनी ट्वीटरवरून लोकांना एक सल्ला दिला आहे की, रंगीत भाज्यांसोबत फ्रूट ज्यूस घेऊ नये. ज्यांनी लिव्हर प्रॉब्लेम आहे त्यांनी तर अजिबातच घेऊ नये.

ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती

सकाळी उपाशी पोटी ज्यूस पिणे अत्यंत अयोग्य असल्याचं तज्ज्ञांचं मत असलं तरी नाश्त्यांनंतर ज्यूस घेणे उपयुक्त असल्याचे ते सांगतात.

ज्यूसला पर्याय म्हणून काय घ्यावे?

कधीतरी ज्यूस घेणे चालू शकते पण रोज घेऊ नये असं डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात. त्या म्हणतात जास्त ज्यूस घेणे चांगले नाही. त्याऐवजी फळं खा. फळांमध्ये फायबर भरपूर असते. त्यामुळे जास्त प्रमाणातल्या शुगरला ते कंट्रोल करते. शिवाय इतर फायदेही आहेत. जसे उन्हाळ्यात नारळ पाणी प्यावे, टरबूज, काकडी, लिंबूपाणी इत्यादी घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.