Mosquito Protection Tips : एक डास चावल्याने ‘त्याची’ 30 ऑपरेशनसह पायाची बोटे कापावी लागली

27 वर्षीय सेबॅस्टियनला एशियन टायगर प्रजातीच्या डासाने घेतला चावा
Mosquito Protection Tips
Mosquito Protection Tips esakal
Updated on

Mosquito Protection Tips : ‘एक मच्छर आदमी को…’ हा नाना पाटेकर यांचा डायलॉग प्रसिद्ध आहे. त्यामूळे जेव्हा डासांचा विषय येतो तेव्हा हा डायलॉग आठवतोच. कारण, भारतात असे एकही ठिकाण नाही जिथे डासांचा मुक्त वावर नाही. पण, परदेशातही डासांचे प्रमाण कमी नाही. डासांमूळे डेंग्यू मलेरीया सारखे आजार पसरतात. पण ते इतके गंभीर नसतात की ज्यामूळे आपल्याला थेट आयसीयूमध्ये भरती व्हावे लागेल. पण, हाच डास चावल्याने एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर ३० ऑपरेशन करावी लागली आहेत. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात.

Mosquito Protection Tips
Mosquitoes Protection : डासांपासून तुमचं संरक्षण करेल अवघ्या दहा रुपयांचा हा उपाय

सेबॅस्टियन रोत्शके नावाच्या व्यक्तीला एका डासाने अशा प्रकारे चावा घेतला की तो 4 आठवडे कोमात राहिला. त्याच्यावर एक-दोन नव्हे तर 30 ऑपरेशन करावे लागले. 27 वर्षीय सेबॅस्टियनला एशियन टायगर प्रजातीच्या डासाने चावा घेतला होता. डास चावल्यावर सुरुवातीला सेबॅस्टियनच्या शरीरात फ्लूसारखी लक्षणे दिसू लागली. पण त्यानंतर तो सतत आजारी पडू लागला. खाणे-पिणे आणि अंथरुणातून उठणेही कठीण झाले. एक प्रकारे सेबॅस्टियनला जगणे कठीण झाले होते.

Mosquito Protection Tips
Wildlife Protection Act : मानवी वस्तीत वाढला वन्य प्राण्यांचा वावर; वाचा, काय म्हणतो कायदा?

जेव्हा त्याने यावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटनमध्ये गेला तेव्हा त्याला जे समजले ते चक्राऊन सोडणारे होते. कारण, या डासाचे विष त्याच्या रक्तात पसरले होते. त्यामूळे त्याच्या यकृतासह मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांनी काम करणे बंद केले होते.

Mosquito Protection Tips
Rava Batata Puri Recipe : पुरी खायला आवडते? पण कधी रवा बटाटा पुरी ट्राय केली आहे का?

या विषामूळे झालेल्या संसर्गामूळे त्याच्या मांडीचा अर्ध्या भारावर कब्जा केला होते. या मांडीवर पसरलेल्या संसर्गात सेराटिया नावाचा विषाणू सापडला. तो इतका धोकादायक विषाणू होता की, त्याने त्याच्या मांडीचा अर्धा भागच खाल्ला. अथक प्रयत्न करून डॉक्टरांनी त्याच्या डाव्या मांडीवर घाण काढून त्यावर त्वचेचे प्रत्यारोपण केले. पण यादरम्यान त्याच्या पायाची दोन बोटे कापावी लागलीत.

Mosquito Protection Tips
Diabetes Patient Health Care: मधुमेहाच्या रुग्णांनी चप्पल बूट खरेदी करतानासुद्धा घ्यावी ही विशेष काळजी

या सर्व काळात सेबॅस्टियन सुमारे चार आठवडे कोमात राहिला. डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये ठेवून उपचार केले. यादरम्यान त्यांना एकूण 30 ऑपरेशन करावे लागले. आता सेबॅस्टियन म्हणतो की, डासाच्या एका छोट्याशा चाव्यानेही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे या छोट्या प्राण्यापासून दूर राहणे चांगले. आणि डास होऊ नयेत याची काळजी घ्या. ज्यामूळे डास चावणार नाहीत.असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.