Mother's Day 2024 : प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे गर्भधारणेचा होय. या गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बाळाच्या जन्मानंतरही तिला तिच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते.
अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याकडे खास लक्ष द्यायला हवे. आपल्या बाळाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही चांगल्या सवयींचा समावेश करायला हवा.
योगा ही एक अशी शक्ती आहे की, जी आई आणि मूल या दोघांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. नियमित योगासने केल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
शिवाय, आई आणि मुलाने एकत्र योगासन केल्याने आरोग्य आणि नाते दोन्ही चांगले राहते. आज जगभरात जागतिक मातृदिन साजरा केला जात आहे, त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला काही योगासने सांगणार आहोत. ज्यांचा सराव आई आणि मूल एकत्र करून आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतात.
मलासन हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाच्या सरावाने मांड्या, पोट आणि पाठीचा कणा ताणला जातो. तसेच, या ताणामुळे पोट आणि मांड्यांमध्ये जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. शिवाय, या योगासनाच्या सरावामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात. हे योगासन मुलांच्या विकासासाठी अतिशय लाभदायी आहे.
हे योगासन करण्यासाठी गुडघे वाकवा आणि पायांच्या बोटांवर बसा. या स्थितीमध्ये तुमच्या शरीराचा संपूर्ण भार पायांच्या बोटांवर असायला हवा. आता दोन्ही हातांनी नमस्काराची मुद्रा करा. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.
बाळाला जन्म दिल्यानंतर अर्थात प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरातील स्नायू कमकुवत होऊ शकतात. हा कमकुवतपणा दूर करण्यासाठी बालासनाचा सराव फायदेशीर आहे. बाळाच्या शारिरीक आणि मानसिक विकासासाठी बालासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. शिवाय, या योगासनाचा सराव अतिशय सोपा आहे. त्यामुळे, लहान मुले देखील आईसोबत हे योगासन सहज करू शकतात.
बालासन करण्यासाठी सर्वात आधी दोन्ही गुडघ्यांवर बसा. त्यानंतर, खाली वाकून हात पुढे करा आणि जमिनीला स्पर्श करा. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात जाण जाणवेल. त्यानंतर, सामन्य स्थितीमध्ये परत या.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.