लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!
Updated on

''50 वर्षाखालील तणावग्रस्त महिला ज्या घरातून काम करत होत्या आणि मुलांसोबत राहत होत्या त्या लॉकडाऊनमध्ये अल्कोहोलचे सेवन सर्वाधिक वाढले'',असे एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.

'फ्रंटियर्स इन सायकियाट्री जर्नल'मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

"आमच्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्यांनी लॉकडाऊन दरम्यान जास्त मद्य सेवन केले ते लॉकडाउननंतरही चालू ठेवण्याची शक्यता आहे," असे प्रमुख लेखक डॉ. झहीर हिया यांनी सांगितले.(mothers drink more during work from home in lockdown)

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!
'वर्किंग वुमन' आहात? मग 'हे' ॲप्स तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत

हियाने या अभ्यासासाठी 17 एप्रिल ते 25 जून 2020 दरम्यान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएस सह 38 देशांमधील 37,206 प्रौढांनी पूर्ण केलेल्या सर्वेक्षणातील परिणामांचे विश्लेषण केले.

त्याने दारू खरेदी आणि वापराचे अहवाल तसेच इतर परिणाम पाहिले. अभ्यासात असे दिसून आले आहे की, काही लोकांचे मद्यपान वाढले (20.2 टक्के), काही कमी झाले (17.6 टक्के) आणि उर्वरित समान पातळीवर राहिले.

संशोधकांना असे आढळून आले की,''अर्ध्याहून अधिक प्रतिसादकांना (53.3 टक्के) सुरुवातीच्या महामारीच्या काळात मानसिक त्रास होत होता.''

ज्यांनी लॉकडाऊनपूर्वी दारूचा साठा केला होती असे मद्यपान करणारे लोक सर्वात जास्त होते, त्यांनी स्वत:च नोंदणी केली.

संशोधकांना असे आढळून आले की, ''अर्ध्याहून अधिक प्रतिसादकांना (respondents)(53.3 टक्के) सुरुवातीच्या महामारीच्या काळात मानसिक त्रास होत होता.''

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!
Women Psychology : प्रेमात पडलेल्या महिलांच्या मनात काय सुरू असते?

महिलांमध्ये 50 वर्षांखालील, उच्च शिक्षित, मुलांसोबत राहणाऱ्या, घरून काम करणाऱ्या आणि मानसिक त्रास असलेल्या स्वतंत्रपणे लॉकडाऊनमध्ये जास्त दारूचे सेवन करत असल्याचे समोर आले.

संशोधकांनी निष्कर्ष काढला की, ''लॉकडाऊनमुळे मानसिक त्रासात वाढ झाली, ज्यामुळे अल्कोहोलच्या सेवनात वाढ झाली, विशेषत: लॉकडाऊन दरम्यान घरातून काम करणाऱ्या महिलांमध्ये ही वाढ दिसून आली.''

हियाने घरात दारूचा साठ करू नका असा सल्ला यावेळी दिला.

''तुम्ही जर दारूचा साठा केला, तुम्हाला पिण्याची इच्छा झाली आणि तुम्हाला दुसरे करायाला काहीच नसेल तर तुम्ही सतत दारू पित राहाल. दारूचा साठा करून ठेवण्यापेक्षा तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि सकारात्मक वातावरणामध्ये राहा, जसे की, व्यायाम करा, क्रिएटिव्ह छंद किंवा कौटुंबिक किंवा व्यावसायिक आधार घ्या.'' असेही त्याने सांगितले.

" फोनवर असो किंवा ऑनलाइन, हेल्पलाईन आणि मानसिक आरोग्यासाठी आधार यासारखी कोणती मदत उपलब्ध आहे याची माहिती असणे महत्वाचे आहे,'' असे तो पुढे म्हणाला.

आणखी एक माहिती संशोधनातून समोर आली ती म्हणजे, ज्यांनी पूर्वी मद्यपान करत होते ते लॉकडाऊनच्या काळात पुन्हा बळी पडण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!
''OMG! काय बाई आहे''; महिलेचे Baby Bump पाहून व्हाल अचंबित!

संशोधनात केलेल्या शिफारशींमध्ये लॉकडाउनदरम्यान मानसिक आरोग्यासाठी अधिक आधार आणि हानिकारक अल्कोहोल वापरासाठी स्क्रीनिंग, अल्कोहोल व्यसनासाठी लॉकडाउन दरम्यान आणि नंतर सतत आधार घेण्याचा सल्ला दिला आहे.

साथीच्या आजारादरम्यान हानी मर्यादित करण्यासाठी अल्कोहोल मार्केटिंग आणि विक्रीच्या आसपास धोरणे तयार करणे उपयुक्त ठरू शकते, असा निष्कर्ष पेपरने काढला.

"अल्कोहोलचा गैरवापर श्वसन प्रणालीतील बदल आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बिघडवून कोविड -19 संसर्गाची संवेदनशीलता देखील वाढवते," ते पुढे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()