Muskmelon Benefits : वजन कमी करण्यासाठी स्वप्नीलने आहारात खरबूजचा केला समावेश, काय आहेत आरोग्यदायी फायदे?

Swapnil Joshi Diet Tips : ‘व्हायफळ’ या पॉडकास्टमधील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Muskmelon Benefits
Muskmelon Benefitsesakal
Updated on

Muskmelon Benefits : मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी त्याचा ‘बाई गं’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातून स्वप्नीलचा एक वेगळाच लूक पाहायला मिळाला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याने फिटनेसवर बरीच मेहनत घेतल्याचे दिसून आले.

आता नुकताच तो त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. ‘व्हायफळ’ या पॉडकास्टमधील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पॉडकास्टमध्ये त्याने बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या. यावेळी त्याने त्याच्या फिटनेसबद्दल ही सांगितले आणि Muskmelon अर्थात खरबूजचा उल्लेख केला.

वजन कमी करण्यासाठी त्याने आहारात खरबूजचा समावेश केला होता. हे खरबूज आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. खरबूजाचे आरोग्याला काय फायदे होतात? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Muskmelon Benefits
Deepika Padukone Skincare : दीपिकाने सांगितले तिच्या ग्लोईंग त्वचेचे सिक्रेट, गरोदरपणात फॉलो करते 'हे' स्किनकेअर रूटीन

हायड्रेशन बूस्टर

खरबूजामध्ये पाण्याचे विपुल प्रमाण आढळून येते. त्यामुळे, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी या खरबूजाचा आहारात जरूर समावेश करावा. खरबूजमध्ये पाण्यासोबतच पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते. जेव्हा तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होईल त्यावेळी हे फळ अवश्य खा. यामुळे, तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होऊ शकेल. खरबूज खाल्ल्यावर पोट भरलेले राहते. त्यामुळे, फार भूक देखील लागत नाही. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी देखील खरबूज फायदेशीर आहे.

पोषकतत्वांचा खजिना

खरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे, फायबर्स, जीवनसत्वे, फोलेट, पोटॅशिअम आणि प्रोटिन यांचा समावेश असतो. त्यामुळे, या फळाचा आहारात समावेश केल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. उन्हाळ्यात हे फळ आवर्जून खाल्ले जाते.

त्वचा राहते हेल्दी

खरबूज हे फळ आरोग्याव्यतिरिक्त तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. खरबूजमध्ये समाविष्ट असलेली पोषकतत्वे तुमच्या त्वचेची आतून स्वच्छता करण्यास मदत करतात. एवढचं नव्हे तर खरबूजमध्ये कोलेजनचे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, त्वचा हेल्दी राहू शकते.

पचनक्षमता मजबूत राहते

खरबूजाचे सेवन केल्याने आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. खरबूजमध्ये असलेले पाणी आणि फायबर आपल्या शरीराच्या पचनक्षमतेसाठी चांगले आहे. हे फळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता टाळण्यासाठी देखील मदत होऊ शकते. यासोबतच नियमितपणे खरबूजाचे सेवन केल्याने आतड्यांची हालचाल नियमित होण्यास मदत होते आणि पोट स्थिर आणि थंड राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.