Mustard Oil : मोहरी असो वा मोहरीचे तेल ते भारतीय घरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जिथे मोहरीचे तेल स्वयंपाकात वापरले जाते, त्याच मोहरीचा वापर खास पाककृती बनवण्यासाठी किंवा टेम्परिंगसाठी केला जातो. यामुळे जेवणाची चवही वाढते. फॉर्च्युन, रिफाइंड आणि डालडा वापरण्याऐवजी मोहरीचे तेल वापरणे चांगले आहे, असे सांगितले जाते. यात पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. मोहरीच्या दाण्यांमध्ये निरोगी खनिजे देखील भरपूर असतात.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिडही मोठ्या प्रमाणात आढळते. हे सर्व त्याचे फायदे आहेत... पण तुम्हाला माहित आहे का की मोहरी किंवा मोहरीचे तेल जास्त वापरल्याने तुमच्या शरीराला काही गंभीर नुकसान होऊ शकते. चला तर जाणून घेऊया मोहरीचे जास्त सेवन केल्याने कोणती समस्या उद्भवू शकते ते.
फुफ्फुसांना होणारे नुकसान - मोहरीच्या तेलात आढळणारे एरुसिक ऍसिड नावाचे अॅसिड देखील फुफ्फुसांना नुकसान पोहोचवते. वास्तविक, मोहरीचा वरच्या श्वसन प्रणालीवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित अहवालानुसार, असे सांगण्यात आले आहे की मोहरीच्या तेलाच्या दीर्घकाळ सेवनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.
अॅलर्जी - फूड अॅण्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननुसार दरवर्षी सुमारे 30,000 अमेरिकन लोकांवर गंभीर फूड अॅलर्जीमुळे उपचार केले जातात, त्यापैकी किमान 200 लोक आपला जीव गमावतात. मोहरी अॅलर्जी सर्वात सामान्य आहे. डॉक्टर म्हणतात की मोहरी ऍलर्जी सर्वात जास्त आहे. कारण त्याचे सेवन केल्याने हिस्टामाइनमध्ये वाढ होऊ शकते आणि अॅनाफिलेक्टिक शॉक देखील होऊ शकतो. यामध्ये अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, श्वास लागणे, डोके दुखणे, सुजलेले डोळे, चेहऱ्यावरील पुरळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
हार्ट डिसीज - आरोग्य तज्ञांच्या मते, मोहरीच्या तेलात एर्युसिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचे महत्त्वपूर्ण नुकसान होऊ शकते. मोहरीचे जास्त सेवन केल्याने मायोकार्डियल लिपिडोसिस किंवा हृदयाचे फॅटी डिजनरेशन होऊ शकते. मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणून ओळखली जाणारी वैद्यकीय स्थिती उद्भवू शकते, ज्यामध्ये ट्रायग्लिसराइड्सच्या वाढीमुळे हृदयाच्या स्नायूच्या मायोकार्डियल तंतूंमध्ये फायब्रोटिक जखमा होतात. डॉक्टर म्हणतात की यामुळे हृदयाच्या स्नायूला नुकसान होऊ शकते आणि काहीवेळा हृदय बंद देखील पडू शकते. (Disease)
ड्रॉप्सी रोग - मोहरीच्या तेलात आर्गेमोन तेलाच्या भेसळीमुळे ड्रॉप्सी रोग होतो. यामुळे किडनी आणि हृदयासह इतर अवयव कमकुवत होतात. यामध्ये दूषित पाणी शरीरात जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे पोटफुगीच्या तक्रारी उद्भवतात. BMJ जर्नल्सनुसार, जलद वेगाने वाढणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने 1998 मध्ये मोहरीच्या तेलावर नवी दिल्लीत बंदी घातली होती. (Health)
गर्भपाताचा धोका - आरोग्य तज्ञांच्या मते, गर्भवती महिलांनी मोहरीचे तेल किंवा काळ्या मोहरीचे जास्त सेवन टाळावे कारण त्यात काही रासायनिक संयुगे असतात जी गर्भासाठी हानिकारक असतात. ऑक्सफर्डने केलेल्या अभ्यासानुसार आणि युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मोहरीमध्ये असलेल्या रसायनांमुळे गर्भपात होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.