National Pollution Control Day : बाहेरील प्रदुषणापेक्षा अधिक घातक आहे घरातील प्रदूषण

गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक देशांमध्ये प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे.
Pollution
PollutionSakal
Updated on

National Pollution Control Day : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक देशांमध्ये प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. भारताची राजधानी दिल्लीमध्ये हवेची पातळी खराब झाल्यानंतर अनेकदा शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. आज देशात राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण दिवस साजरा केला जात आहे.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Pollution
हवा प्रदुषणामुळे 40 टक्के भारतीयांचं आयुष्य 9 वर्षांनी होणार कमी

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशभरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांना जागरुक करणे हा यामागचा उद्देश आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याच्या दुष्परिणामांपासून वाचवता येईल. आज या निमित्ताने आम्ही तुम्हाला घरातील प्रदूषण म्हणजे काय, ते कसे पसरते आणि त्यापासून कसा बचाव करायचा याबाबत माहिती सांगणार आहोत.

Pollution
Image Gallery: अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर होतात हे 7 दुष्परिणाम

बाहेरील प्रदूषणामुळे वाढते घरातील प्रदूषण

बाहेरील वातावरणात प्रदुषणाची पातळी वाढली की, आपोआपच घरातील प्रदुषणातदेखील वाढ होते. दारं, खिडक्या व्यवस्थीत बंद न केल्यास ही पातळी वाढू शकते. घरात वातावरण सुगंधी होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींमुळेदेखील प्रदुषणाचा स्तर वाढू शकतो. यामध्ये मुख्यतः सिगारेट, पेंट्स आजी गोष्टींच समावेश असू शकतो. आज अनेक घरांमध्ये एसी, वायफाय आदी गोष्टी चोवीस तास सुरू असतात. या गोष्टींचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. याशिवाय शेणखत, लाकूड इत्यादी जाळल्यामुळेदेखील घरातील प्रदूषणात वाढते.

Pollution
जास्त उष्णतेने वायू प्रदुषणात वाढ

घरातील प्रदूषणामुळे लाखो मृत्यू

फ्रीजमधून निघणारा गॅस आपल्या घरातच राहतो. याशिवाय मायक्रोवेव्ह ओव्हन, एसी, वायरलेस कॉम्प्युटर, कॉर्डलेस फोन आणि इतर वायरलेस उपकरणे, वायफाय आदींमधूनही किरणोत्सर्ग पसरतो. आजच्या काळात या गोष्टींमध्ये राहण्याची आपल्या सर्वांनाच सवय झाली आहे. एकवेळ बाहेरील प्रदुषणापासून आपण काहीवेळा स्वतःला वाचवू शकतो. पण घरातील या वस्तूंपासून होणाऱ्या प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करणे हे मोठे आव्हान बनले आहे.

ऑक्सफर्डच्या ourworldindata.org संस्थेच्या मते, जगातील सर्वाधिक अकाली मृत्यू घरातील प्रदूषणामुळे होतात. याशिवाय घरातील प्रदूषणामुळे अनेकांची चिडचिड, तणाव, झोप न लागणे, नैराश्य यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Pollution
National Pollution Control Day : प्रदूषणाने वाढतोय वंध्यत्वाचा धोका, भावी पिढीसाठी धोक्याची घंटा

फ्लॅटमधील घरातील प्रदूषण अधिक

देशाची लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतशी जागा मर्यादित असल्याने फ्लॅट संस्कृतीही जोमाने वाढत आहे. फ्लॅट संस्कृतीने घरातील प्रदूषणाला अधिक प्रोत्साहन मिळत आहे. कारण फ्लॅटमधील व्हेटिलेशन योग्यप्रकारे होत नाही.

संरक्षणासाठी काय करावे

  • घराच्या बाल्कनीत किंवा अंगणातील कुंडीत पिंपळ, तुळशी इत्यादी वनस्पती लावावी, ज्यामुळे प्रदूषण दूर होऊन हवा शुद्ध होण्यास मदत होईल.

  • घर पूर्णपणे बंद ठेवणे टाळा. दिवसा खिडक्या आणि दरवाजे उघडा ठेवा जेणेकरून हवा आणि सूर्यप्रकाश घरात येण्यास मदत होईल.

  • बेडरुममध्ये फ्रीज ठेवण्याऐवजी ज्या ठिकाणी सतत जाणे होत नाही. त्या ठिकाणी ठेवा. तसेच मर्यादित इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा वापर करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.