‘आहाराकडे जास्त लक्ष आवश्यक’

सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याची खूप गरज आहे. आरोग्य तंदुरुस्त असेल, तरच आपल्या जीवनात आनंद आणि समाधान मिळते.
actress nidhi tapadia exercise
actress nidhi tapadia exercisesakal
Updated on

- निधी तापडीया, अभिनेत्री, मॉडेल

सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याची खूप गरज आहे. आरोग्य तंदुरुस्त असेल, तरच आपल्या जीवनात आनंद आणि समाधान मिळते. त्यामुळेच माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी मी ध्यानधारणा आणि व्यायाम करते.

आठवड्यात मी पाच दिवस व्यायाम करते. त्यामध्ये वेटलिफ्टिंग, कार्डिओ आणि ॲनिमल मूव्हमेंट करते. दोन दिवस मसल्स डेव्हलप होण्यासाठी वेळ देते. माझ्या आहारात दिवसातून चार ‘मील्स’ घेते. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आणि रात्री जेवण अशी माझी पद्धत आहे.

आहारामध्ये प्रोटिन असलंच पाहिजे, याकडे मी प्रकर्षानं लक्ष देते. त्याचबरोबर एक्स्ट्रा प्रोटिनसाठी मी काही सप्लिमेंटही घेते. माझी त्वचा, केस आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन्स जास्तीत जास्त आपल्या आहारात कशी जातील, यासाठी प्रयत्न करते. गरज पडल्यास व्हिटॅमिनच्या गोळ्याही घेते.

व्यायामामध्ये सातत्य आणि शिस्त असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही घरात असाल किंवा घराच्या बाहेर असाल, एखाद्या ठिकाणी जिम नसेल किंवा सुविधा उपलब्ध नसतील त्या ठिकाणी तुम्ही छोटे छोटे एक्सरसाइज करू शकता. योगा, रनिंग, कार्डिओ, सायकलिंग अशा प्रकारचे व्यायाम करू शकता.

आपल्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण जास्त होणार नाही, याबाबत मी अतिदक्ष आहे. जास्त गोड पदार्थ खाल्यानं आपण एक प्रकारे आजारालाच निमंत्रण देत असतो. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरील चमकदारपणा कमी होऊन वयस्करही दिसायला लागतो. त्यामुळे साखर मी कमी खाते. मात्र, गोड खाण्याची इच्छा झाल्यास खजूर, कोको, डार्क चॉकलेट हे आहारात घेते.

आरोग्य हीच आपल्या आयुष्यातील खरी संपत्ती आहे. त्यामुळे मी माझ्या फिटनेस व व्यायामाबाबत प्रामाणिकच राहते. सत्तर टक्के आहार आणि तीस टक्के व्यायाम हे सूत्र मी अवलंबलं आहे. त्यामुळे डाएट मी प्रामाणिकपणे अवलंबण्याचा प्रयत्न करते. दिवसात चार ते पाच लिटर पाणी न चुकता पिते. आहारामध्ये प्रोटिन्ससोबतच कार्ब्जही खूप महत्त्वाचे आहेत.

त्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढते, दिवसभरातील कामाची एनर्जी मिळते. एखाद्या दिवशी कोणत्या कारणामुळे तुमचा व्यायाम झाला नाही तरी चालेल; मात्र आहाराचं सूत्र पाळलंच पाहिजे. फायबर मिळण्यासाठी मी विविध प्रकारच्या पालेभाज्या खाते; तसेच प्रोटिनसाठी अंडी खाते. शरीराला गरजेच्या असणाऱ्या उर्वरित गोष्टी कार्ब्जमधून मिळतात.

मला पुस्तकं वाचण्याचाही मला छंद आहे. त्यातून आपल्याला जगभराची माहिती मिळते, ज्ञानातही भर पडते. मी पॉडकास्टही ऐकते. त्यातून मनोरंजनासह माहितीचा खजिनाही उलगडतो. त्यामुळे माझं मनही आनंदित राहतं.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स

  • जगात कुठंही असलात, तरी स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी दिवसातील २४ तासांमधील एक तास आपल्या आरोग्यासाठी द्या.

  • ‘हेल्थ इज वेल्थ’ या मंत्रावर माझा खूप विश्वास आहे. त्यामुळे व्यायाम, ध्यानधारणा, प्राणायाम, रनिंग किंवा सायकलिंग केल्यास त्यातून तुम्हाला शंभर टक्के सकारात्मक ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही.

  • व्यायामामध्ये सातत्याबरोबरच आहारही त्याहून अधिक महत्त्वाचा आहे. या दोन गोष्टी पाळल्या, तर तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल.

  • साखरेला आपण ‘स्वीट पॉयझन’ असं म्हणतो. अति गोड पदार्थ आहारातून जास्तीत जास्त प्रमाणात कमी करा.

  • मन आनंदी ठेवण्यासाठी ज्या गोष्टीची आवड आहे, तो छंद अगदी मनापासून जोपासा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.