New Born Baby : बाळाच्या जन्मानंतर २४ तासांत बाळ रडलं नाही तर...? बाळाच्या रडण्याचं थेट हृदयाशी कनेक्शन

बाळाच्या जन्माच्या 24 तासांच्या आत ते रडणे डॉक्टरांसाठी का महत्वाचे असते माहितीये? या सर्व प्रश्नांमागील कारण आणि त्याची उत्तरे जाणून घेऊया
New Born Baby Cry
New Born Baby Cryesakal
Updated on

New Born Baby Cry : पालक आणि बाळाचं नातं हे अतिसंवेदनशिल असतं असं म्हणायला हरकत नाही. आपलं बाळ रडावं असं कुठल्याच पालकांना वाटत नसतं. आपलं बाळ जन्मताच हसत खेळत असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण नवजात बाळाचं रडणं किती महत्वाचं आहे याची कल्पना तुम्हाला आहे काय?

तुम्हीही तुमच्या कुटुंबात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये नवजात बाळाला जन्माच्या वेळी नेहमी रडताना पाहिलं असेल. या मागचे कारण माहित आहे का? जर नवजात बाळ त्याच्या जन्माच्या वेळी रडत नसेल तर? शेवटी, बाळाच्या जन्माच्या 24 तासांच्या आत ते रडणे डॉक्टरांसाठी का महत्वाचे असते माहितीये? या सर्व प्रश्नांमागील कारण आणि त्याची उत्तरे जाणून घेऊया.

जन्माच्या वेळी किंवा जन्माच्या २४ तासाच्या आत बाळाचे रडणे का महत्वाचे?

जन्माच्या वेळी बाळाचे रडणे हे त्याच्या जगण्याचे लक्षण मानले जाते. तुमच्या बाळाचे रडणे हे दर्शवते की त्याचे हृदय आणि फुफ्फुस चांगले काम करत आहेत. बाळाला मोठ्याने रडणे हे सूचित करते की तो पूर्णपणे निरोगी आहे. दुसरीकडे, जर नवजात बाळ खूप मंद आवाजात रडत असेल, तर असे सूचित केले जाते की त्याला आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात. (New Born Baby)

New Born Baby Cry
Healthy Heart Tips :  या लाल फळाशी कराल गट्टी, तर होईल Heart Attack ची सुट्टी!

निरोगी बाळाने दिवसातून किमान 2-3 तास किंवा 24 तास खूप वेळा रडले पाहिजे. परंतु जर बाळ 4 तासांपेक्षा जास्त काळ रडत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तथापि, जसजसे बाळ वाढते तसतसे रडण्याची काळ देखील कमी होते. (Heart Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.