New year Celebration : ओव्हर ड्रिंकनंतर उलट्या झाल्यास काय कराल? करा हे 8 उपाय

ओव्हरड्रिंकमुळे तुम्हाला उलट्या झाल्यास हे काही उपाय माहिती असायला हवे
Vomiting Remedy At Home
Vomiting Remedy At Homeesakal
Updated on

Home Remedy : न्यू इयरच्या सेलिब्रेशनचा मूड तुम्हाला सगळीकडे आज दिसून येईल. अनेकजण सेलिब्रेशनच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक घेतात. मात्र याचं अतिसेवन झाल्यास तुम्हाला वेगेवगळ्या समस्या उद्भवू शकतात. तेव्हा ओव्हरड्रिंकमुळे तुम्हाला उलट्या झाल्यास हे काही उपाय माहिती असायला हवे.

जेव्हा ओव्हर ड्रिंक केल्याने लोकांना उलट्या होतात तेव्हा ते फार्मसीमधल्या गोळ्या घेतात किंवा आणखी ड्रिंक करतात. ओव्हरड्रिंक केल्यानंतर काहींना डोकेदुखी तर काहींना उलट्यांचा त्रास होतो. चला तर आपण असे काही उपाय जाणून घेऊया ज्याने तुमच्या उलट्या लगेच थांबतील. तसेच तुम्हाला बेटर फिल होईल.

दारू प्यायल्यानंतर उलट्या का होतात?

जेव्हा तुम्ही ड्रिंक करता तेव्हा तुमच्या शरीरातील अॅसिटाल्डिहायडरची पातळी वाढते. या स्थितीत तुमचं शरीर उलट्या होण्यास प्रवृत्त होतं. अशात तुम्हाला पोटाचे विकार उद्भवतात. तेव्हा अति दारू पिऊ नका.

१. पाणी पिऊ नका

ड्रिंक केल्यानंतर तुमची बॉडी डिहायड्रेट होते. अशा स्थितीत तुम्ही पाणी प्या. याने हँगओव्हर कमी होईल आणि उलट्या येणंही बंद होईल.

Vomiting Remedy At Home
Weight loss drink: नव्या वर्षात वेट लॉस करायचंय? या बिया टाकत बनवा वेट लॉस ड्रिंक; होईल कमाल

२. अॅवोकॅडो

ड्रिंक केल्यानंतर उल्टी झाल्यास अॅवोकॅडो प्या. अॅवोकॅडोमध्ये पोटॅशियम असतं. हे लिव्हरला डॅमेज होण्यापासून तुमचा बचाव करतात. शिवाय अॅवोकॅडो घेणे आरोग्यासाठीही चांगले असते.

३. लिंबू पाणी

ड्रिंक केल्यानंतर उल्टी झाल्यास लिंबू पाणी प्या. त्यासाठी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. यात लिंबाचा रस पिळून घ्या. याने उलट्यांचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

४. चावून चावून खा

तुम्ही ड्रिंक करत जेवण करत असाल तर तुम्ही चावून चावून जेवण करायला हवे. कारण घाईघाईत जेवण जेवल्याने उलट्यांची शक्यता आणखी वाढते. तेव्हा ड्रिंक केल्यानंतर तुम्ही घाईघाईत जेवू नका.

५. ग्रीन टी

ड्रिंक केल्यानंतर तुम्हाला उलट्या झाल्यास तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टीने मेटाबोलिझम वाढतो. त्यामुळे तुमच्या लीवरला इजा कमी होते. ड्रिंक केल्यानंतर ग्रीन टी प्यायल्याने शरीराला थोडा आराम मिळतो.

६. नारळ पाणी

ड्रिंक केल्यानंतर तुम्हाला सतत उलट्या होत असेल तर तुमची बॉडी डिहायड्रेट होते. अशा वेळी तुम्ही नारळ पाण्याचं सेवन करू शकता. नारळ पाण्यात इसेक्ट्रोलाइट्स असतात. याने तुमची बॉडी हायड्रेट होऊ शकते.

७. आल्याचा रस

उलट्यांमध्ये आल्याचा शरीरावर चांगला असर होतो. आल्याच्या रसात मध घालून प्या. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स उलट्यांना रोकतात. आलं खाल्ल्याने हँगओव्हरही उतरतं.

८. संत्रे

संत्र्यानेही उलट्या रोकण्यास बऱ्या प्रमाणात मदत होते. संत्र्यामध्ये विटॅमिन सी असते. संत्री ब्लडमध्ये ग्लूटाथियोनचा स्तर वाढवते. संत्री तुमच्या बॉडीला डिटॉक्स करण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.