केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या कामाबद्दल तर आपण सर्वजण सतत ऐकत असतो. पण आज त्यांचं डाएट आणि वेटलॉसबद्दलही जाणून घ्या. नितीन गडकरी यांनी वेटलॉस करून अगदी आश्चर्याचा धक्काच दिला. यासाठी त्यांनी काय केलं? जीवनशैलीत काय बदल केले?
कोरोनानंतर नितीन गडकरी यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांविषयी नितीन गडकरी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली आहे. १३५ वरुन ८९ किलोवर त्यांनी आपलं वजन आणल्याचं गडकरी यांनी सांगितलं. तसंच श्वसनाच्या संबंधी तक्रारी दूर करण्यासाठी त्यांनी योग, प्राणायाम व व्यायामाची मदत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
नितीन गडकरी यांनी व्यायामाचं महत्त्व पटवून सांगितलं असून आपल्या रुटीनमध्ये आपण कोणता व्यायाम करतो, याविषयीही माहिती दिली आहे.
श्वसनाचे व्यायाम
श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी नाकावाटे मोठा श्वास आत भरून घ्या व नंतर छाती आणि पोटात काही सेकंद श्वास ठेवून नाकावाटे बाहेर सोडा.
लिप ब्रिदींग - यामध्ये नाकावाटे श्वास घेऊन फुंकर मारल्याप्रमाणे तोंडावाटे हळूहळू श्वास सोडणे.
मेणबत्ती - नाकाने मोठा श्वास घ्या आणि एकाच वेळी खूप मेणबत्त्या विझवल्याप्रमाणे श्वास बाहेर सोडा, हा व्यायाम १० वेळा करावा.
थोरेसिक एक्सपान्शन - या व्यायामाने फुफ्फुसांमध्ये अडकलेला कफ निघून जातो. नाकाने मोठा श्वास घ्या, शक्य होईल तोवर धरून ठेवा आणि मग तोंडाने श्वास सोडा. हा व्यायाम १० वेळा करावा.
फुगा फुगवण्याचा व्यायाम - नाकाने मोठा श्वास घ्या. एखादा फुगा घ्या आणि तो एकाच श्वासात फुगवण्याचा प्रयत्न करा.
सेगमेंटल एक्सपान्शन - या व्यायामात पोटाला तीन ठिकाणी बेल्टने बांधा. जास्त दाब देऊ नका. जसा नाकाने श्वास सोडाल, तसं एक एक कपडा सोडा, हा व्यायाम पाच वेळा करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.