Nagpur News : लसीकरण धोरणात गालफुगीचा नाही समावेश

प्रतिबंधक लसीकरणापासून चिमुकले अद्यापही दूरच
not included in vaccination policy mumps virus health nagpur
not included in vaccination policy mumps virus health nagpursakal
Updated on

नागपूर : एकीकडे शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके व किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान शासन राबवते. तर दुसरीकडे बाळांना भविष्यात ‘गालफुगी’ (गलगंड-मम्प्स)सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक लसीकरणाचा समावेश राष्ट्रीय लसीकरण धोरणात नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.

लसीकरण हा बालकांच्या संगोपनातील महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. १ वर्षाच्या आतील बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. बाळ जन्माला आल्यानंतर वेळेवर लसीकरण केले पाहिजे.

यामुळे त्याचे अनेक आजारांपासून चे संरक्षण होऊ शकते. म्हणूनच लसीकरण ही बाळाची कवचकुंडले आहेत. असे म्हटले जाते. क्षयरोग प्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, पोलिओ प्रतिबंधक डोस, गोवरची लस देण्यासाठी शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर जिल्हा रुग्णालयात सोय आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही हा लसीकरण कार्यक्रम राबवला जातो. झोपडपट्टीतील प्रत्येक नवजात शिशूला एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत लसीकरण केले जाते. मात्र गालफुगी अर्थात ‘मम्प्स’ या आजारावरील प्रतिबंधक लस शासनाकडूनच मोफत मिळत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

लसीकरणाच्या धोरणात तफावत

शासनाचे लसीकरण धोरण आणि इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनच्या लसीकरण धोरणात काही प्रमाणात तफावत असल्याचे दिसत आहे. शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण धोरणात गालफुगीसारख्या आजारावर लस दिली जात नाही. मात्र खासगी बालरोग तज्ज्ञांची संघटना असलेल्या भारतीय बालरोग संस्थेच्या धोरणात गालफुगी नियंत्रणासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

गालफुगी नियंत्रणासाठी लसीकरण ः डॉ. खळतकर

अलीकडे महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेशामधील काही शहरांमध्ये गालफुगीची प्रकरणे वाढत आहेत. संक्रमित व्यक्तींना सामान्यतः जबड्याभोवती वेदना, सूज आणि कोमलता विकसित होते, जी एका बाजूला सुरू होते.

हळूहळू दुसऱ्या बाजूला समाविष्ट होते. त्यांना सूज येण्याआधी ताप, डोकेदुखी, भूक न लागणे (एनोरेक्सिया), अस्वस्थता आणि मांसपेशी दुखणे (मायल्जिया )अशी लक्षणे दिसत आहेत. नागपुरातही अशी प्रकरणे पुढे आली आहेत.

हा विषाणूजन्य संसर्ग असून जबड्याभोवती लाळ ग्रंथींना प्रभावित करतो. साधारणपणे जानेवारी ते मे दरम्यान दरवर्षी तुरळक प्रमाणात हा आजार दिसतो. दर चार-पाच वर्षांनी या साथीचा उद्रेक होतो. संक्रमित व्यक्तींच्या श्वसन स्रावांच्या जवळच्या संपर्कामुळे त्याचा प्रसार होतो.

जबड्यावर सूज सुरू झाल्यानंतर दोन दिवस आधी ते ५ दिवसांनंतर रुग्ण इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे. यामुळे मुलांना गालफुगीपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे अध्यक्ष भारतीय बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.