Cholesterol : शिरांमधील खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी सोपा उपाय; 'हा' पदार्थ दररोज खा!

धावती जीवनशैली वाढती कोलेस्ट्रॉलची पातळी हे हृदयविकाराचे प्रमुख कारण मानले जात
Cholesterol
Cholesterol
Updated on

भारतात कित्येक लोक हृदयविकाराच्या आजाराला बळी पडत आहेत. अलिकडच्या वर्षांत हा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात कार्डिओ व्हॅस्कुलर डिसीज (CVD) मुळे मृत्यू होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. हृदयविकारामुळे 20 ते 40 वयोगटातील लोकांनाही या काळात जीव गमवावा लागला आहे, अशी आश्‍चर्यकारक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आनुवंशिकता, मधुमेह, धूम्रपान-मद्यपान आणि धावती जीवनशैली, वाढती कोलेस्ट्रॉलची पातळी हे हृदयविकाराचे प्रमुख कारण मानले जात आहेत.

कोलेस्टेरॉल हा एक फॅटी पदार्थ आहे जो शरीरात आढळतो. चांगले कोलेस्टेरॉल शरीराच्या आरोग्यास प्रोत्साहन देते तर खराब कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लक तयार करून अडथळे निर्माण करण्याची शक्यता असते. यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो. या आजारांची लक्षणे सुरुवातीला गंभीर नसतात पण जर तुम्हाला वाईट कोलेस्टेरॉलचा त्रास दीर्घकाळ होत असेल तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात.

Cholesterol
Astro Tips : 'या' रंगांचे बूट वापरणे टाळा; नाहीतर नकारात्मकता करेल परिणाम

तुम्ही रोजच्या जीवनशैलीत आणि आहारात काही बदल केला तर हे आजार वाढण्यापासून रोखू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या पण महत्त्वाच्या खाद्यपदार्थाबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. यामुळे अवघ्या काही आठवड्यांत तुमच्या शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल 30 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

अनेक डॉक्टर, आहारतज्ज्ञ हे सकाळच्या नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा आणि पोषण मिळते. ओट्समध्ये फायबर, जीवनसत्त्वे अनेक प्रकारचे पोषकद्रव्ये असतात. सकाळी लवकर नाश्ता केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. देशातील फिटनेस आणि वेलनेस ऑर्गनायझेशन एबलनुसार, ओट्स तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. ओट्समध्ये विरघळणारे फायबर हे शरीराची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. विरघळणारे फायबर बीटा ग्लुकन शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि जुनाट आजार दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Cholesterol
Astro Tips : चपाती बनवताना करू नका या चुका?; नाहीतर भोगावे लागणार वाईट परिणाम!

हार्ट यूके ही हृदयरोगांवर काम करणारी यूकेची संस्था, स्पष्ट करते की जेव्हा ओट्समध्ये असलेले फायबर तुमच्या शरीरात जाते, तेव्हा ते जेलमध्ये बदलते आणि आतड्यांमध्ये कोलेस्टेरॉल-समृद्ध पित्त ऍसिड बांधण्याचे कार्य करते. ज्यामुळे तुमचे रक्त खंडित होण्यास मदत होते. यामुळे प्रवाहातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण मर्यादित ठेवण्यास मदत होते. यकृताला पित्त नाशक बनवण्यासाठी रक्तातून अधिकचे कोलेस्टेरॉल काढून टाकण्याची गरज आहे. ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला बऱ्याच कालावधीसाठी पोटभर खाल्ले असल्याचा मूड राहतो. यामुळे वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. ड्रायफ्रुट्स, वेगवेगळ्या बिया आणि फळे मिसळून ओट्स खाल्ले तर तुमच्या शरीराला अधिक पोषकतत्वे मिळू शकतात.

तुमच्या रोजच्या जीवनशैलीतील अनेक बदलही कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. विविध प्रकारचे सॉसेज, लोणी, बिस्किटे आणि चीजमध्ये आढळणाऱ्या सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन कमी करूनही कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले जाऊ शकते. तुम्ही दररोज व्यायाम केला तर एकंदरीत तुमचे आरोग्य चांगले राहील आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहील.

Cholesterol
Astro Tips : देवघरात दिवा लावण्याच्या ‘या’ टीप्स वाचाच; नाहीतर याल अडचणीत !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.