Office Yoga To Improve Confidence Garbhasan : प्रत्येकच क्षेत्रात स्पर्धा मोठ्याप्रमाणात वाढली आहे. इतरांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ हे सिद्ध करण्याचीही स्पर्धा सुरू असते. अशा सगळ्या स्पर्धात्मक आणि नकारात्मक वातावरणात आपला आत्मविश्वास तर कमी पडत नाही ना... या शंकेत बहुतेक जण वावरत असतात. याचा एक वेगळा ताण मनावर असतो.
अशावेळी पातंजली योग हे आपल्यासाठी फारच मदतशीर ठरते. म्हणूनच गर्भासन हे आसन नियमित करणे हे फायद्याचे ठरते. जाणून घेऊया पद्धत आणि फायदे.
गर्भासन हे बैठकस्थितीमधील तोलात्मक आसन आहे.
असे करावे आसन
प्रथम पद्मासन घालून बसावे.
नंतर डावा हात डावी मांडी व पोटरी यामधून घालावा. तसेच उजवा हात-उजवी मांडी व पोटरी यामधून घालावा.
आता मांडीकडील भाग जमिनीपासून थोडा वर उचलून दोन्ही हात कोपरापर्यंत बाहेर घ्यावेत.
डावा तळहात उजव्या गालावर ठेवावेत. यावेळी मांडीचा भाग जास्तीत जास्त पोटाकडे घ्यावा.
पाठ ताठ व मान सरळ असावी. नजर स्थिर व श्वसन संथ सुरू असावे.
आसनात स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा.
आसन सावकाश उलट क्रमाने सोडावे.
आसनाचे फायदे
तोलात्मक आसन असल्याने एकाग्रता, आत्मविश्वास वाढतो.
पोटावर दाब आल्याने वातविकार, अपचन, बद्धकोष्ठता या तक्रारी दूर होतात.
पोटातील इंद्रिये अंकुचित होतात त्यामुळे पचनसंस्था, उत्सर्जन संस्थेचे कार्य सुधारण्यास मदत होते. कार्यक्षमता वाढते.
मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त.
काळजी
गुडघेदुखी, कोणतेही शल्यकर्मे झाली असतील किंवा काही लिगामेंट दुखापत असल्यास आसन करू नये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.