Old Toothbrush Side Effects : सकाळीच जूना फेकून नवा Toothbrush काढा, कारण...

जुने टूथब्रश वापरल्याने कधीकधी गंभीर संक्रमण होऊ शकते
Toothbrush Side Effects
Toothbrush Side Effects esakal
Updated on

Toothbrush Side Effects : रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणतं काम केलं जात असेल. तर ते म्हणजे ब्रशने दातांची सफाई करणे होय. पुर्वी दातांसाठी कडुलिंबाची काठी वापरली जात होती. पण आता ती जागा ब्रशने घेतलीय. ब्रशचे आकारही किती ऍक्टीव्ह झालेत. ज्यामुळे आपले दात अधिकच स्वच्छ होतात.

आपले तोंड हे अनेक जंतूंचे आश्रयस्थान असते आणि तोंडात जमा झालेले किटण वा अन्नकण आपण ब्रशच्या सहाय्याने बाहेर काढत असतो. या प्रक्रियेत आपल्या ब्रशाचे ब्रिसल्स तोंडातल्या जंतूंच्या संपर्कात येत असताता. त्यामुळे नळाच्या वाहत्या पाण्याखाली आपला ब्रश नीट स्वच्छ करणे जरूरी असते.

केवळ स्वच्छताच नाही. तर, योग्य वेळी ब्रश बदलणेही गरजेचे आहे. कारण मुख शुद्धी करणं महत्त्वाचं आहे. ते काम जर नीट झाले नाही. तर, आपल्याला अनेक आजारांची लागण होऊ शकते. ब्रश नीट नसेल तर दातही पिवळे पडतात आणि त्यामुळे आपल्यालाच चार चौघात लज्जा निर्माण होऊ शकते.

Toothbrush Side Effects
World Oral Health Day 2022: ब्रश- फ्लॉस करण्याची योग्य पद्धत कोणती?

दात स्वच्छ होत नाहीत

तीन महिन्यानंतर टूथब्रशचे ब्रिस्टल्स तुटू लागतात. अशावेळी ब्रिस्टल्स कमी झाल्यामुळे तुम्ही तोंड नीट साफ करू शकत नाही, ज्यामुळे तुमचे दात पिवळे आणि बॅक्टेरियायुक्त होऊ शकतात.

इन्फेक्शनचा धोका

ठरलेल्या वेळेत टूथब्रश न बदलल्यास दातांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे आपण बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्गास बळी पडू शकता.

Toothbrush Side Effects
Makeup Brush : अशी करा मेकअप ब्रशची स्वच्छता; नाहीतर....

तोंडात फोड

जुने टूथब्रश तोंड पूर्णपणे स्वच्छ करत नाहीत, त्यामुळे तोंडात जंतू राहतात. अशावेळी आपल्या तोंडावर आणि जिभेवर फोड दिसू शकतात. टूथब्रश बदलून आपण तोंडात अल्सर होण्याची शक्यता कमी करू शकता.

दातांमधील पोकळी

दात पोकळीपासून दूर ठेवण्यासाठी लोक अनेक महागड्या तोंडी काळजी उत्पादनांचा आधार घेतात, परंतु आपल्या जुन्या टूथब्रशमुळे दातांमध्ये पोकळी देखील होऊ शकते. अशावेळी दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलून पोकळीपासून सुटका मिळवू शकता.

गंभीर संसर्गाची भीती

जुने टूथब्रश वापरल्याने कधीकधी गंभीर संक्रमण होऊ शकते. अशावेळी दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलून तुम्ही इन्फेक्शन तर टाळू शकताच, शिवाय दात स्वच्छ, निरोगी आणि दुर्गंधीमुक्त ही ठेवू शकता.

Toothbrush Side Effects
Tooth in Food : ब्रिटीश एअरवेजच्या पदार्थांमध्ये सापडला चक्क दात; महिला प्रवासी संतापली

टुथब्रशची स्वच्छता कशी करावी

याबाबतीत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकच एक टुथब्रश वर्षानुवर्षे वापरू नये. दर ३ ते ६ महिन्यांनी ब्रश बदलावा.

ब्रश झाल्यानंतर ब्रश धुताना तो नुसता पाण्याखाली धरू नका. तुमच्या अंगठ्याने ब्रशचे ब्रिसल्स वरून खाली आणि खालून वर यादिशेने २ ते ३ वेळा फिरवा, जेणेकरून त्यातली घाण निघून जाईल.

ब्रश धुतल्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी झटकून टाका आणि ब्रश अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला स्वच्छ सुर्यप्रकाश आणि हवा लागेल.

बरेच जण ब्रश बंदिस्त कप्प्यात ठेवून देतात, जिथे अजिबातच हवा, किंवा सुर्यप्रकाश नसतो. असे करणे खूप चुकीचे आहे कारण त्यामुळे ब्रशवर बॅक्टेरिया जमायला सुरुवात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.