पॅनिक ॲटॅक डिसॉर्डरविषयी आपण गेल्या आठवड्यात बघितलं. आता त्याची लक्षणं, आणि उपाय यांच्याविषयी माहिती घेऊ.
पॅनिक ॲटॅकची लक्षणं
1) श्वास पुरत नाहीय असं वाटतं.
2) छातीत धडधडतं.
3) छातीत दुखतं.
4) शरीराचा थरकाप होतो.
5) गुदमरल्यासारखी भावना होते.
6) घाम फुटतो.
7) मळमळतं किंवा पोट बिघडल्याची भावना होते.
8) बधिरता येते.
9) मृत्यू येईल अशी प्रचंड भीती वाटायला लागते.
साधारण वीस-पंचवीस मिनिटं ही भावना टिकू शकते आणि या दरम्यान व्यक्ती हतबल आणि हताश होऊन जाते. त्यानंतर सगळं नॉर्मल झालं, तरी पुन्हा असं कधी होईल ही भीती आत दबा धरून बसते (Anticipatory Anxiety) आणि मग ज्या ठिकाणी असं पूर्वी झालंय ती ठिकाणं आणि प्रसंग टाळले जायला लागतात (Phobic Avoidance).