Exercise For Height तुमच्या मुलांची उंची वाढत नाहीय? त्यांच्या वर्कआऊट रूटीनमध्ये या 5 साध्यासोप्या व्यायामांचा करा समावेश

मुलांच्या शरीराची उंची वाढवण्यासाठ त्यांच्या वर्कआऊट रूटीनमध्ये या पाच साध्यासोप्या व्यायामांचा समावेश करावा.
Exercise For Height
Exercise For HeightSakal
Updated on

Exercises For Kids Hight : कधीकधी काही मुलांची शारीरिक उंची त्यांच्या पालकांच्या उंचीसारखी वाढत नाही. पण शरीराची उंची ही अनुवंशिकता या घटकावरही अवलंबून असते. दुसरीकडे हल्लीची मुलं शारीरिकदृष्ट्याही कमी प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यामुळे म्हणावा तसा त्यांच्या शारीरिक विकास होत नाही.

आपल्या रूममध्ये बसून मोबाइल, लॅपटॉपवर गेम खेळणे, आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा अभाव असणे आणि जंकफूडचे जास्त प्रमाणात सेवन करणे यासारख्या गोष्टींमुळे मुलांच्या शारीरिक विकासावर दुष्परिणाम असतात.

Exercise For Height
Child Eye Care Tips : सतत पडणारा मोबाईलचा प्रकाश मुलांच्या डोळ्यांसाठी घातक! तज्ज्ञ सांगतात...

मुलांची शारीरिक उंची वाढण्याकरिता त्यांना नियमित काही साधेसोपे व्यायाम करायला लावावे. यामुळे उंची वाढण्यासोबतच त्यांचे शरीरही निरोगी राहण्यास मदत मिळेल. तुमच्या मुलांच्या वर्कआऊट रूटीनमध्ये या पाच सोप्या व्यायामांचा नक्कीच समावेश करा.  

Exercise For Height
Child Health Tips तुमचे बाळ दूध पीत नाही? तर कॅल्शिअमची कमतरता ‘या’ पदार्थांनी काढा भरून

स्ट्रेचिंग

जर तुमच्या मुलांची उंची वाढत नसेल, तर त्यांना नियमित व्यायाम करायला लावा. सकस आणि पोषक आहार घेतल्यास मुलांच्या शरीराचे स्नायू, हाडे मजबूत होतील तसेच त्यांच्या शरीराची उंची देखील वाढेल. दररोज स्ट्रेचिंग केल्याने शरीर लवचिक होईल. टो-टच स्ट्रेच, कोब्रा स्ट्रेच, कॅट-काऊ स्ट्रेच, हॅमस्ट्रिंग स्ट्रेचसह व्यायामास सुरुवात करा.  

Exercise For Height
Child Health : मुलांना होणाऱ्या उलट्या, जुलाब गांभीर्याने घ्या; असू शकतो हा आजार

योगासनांमुळे वाढेल उंची

योगासनांमुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.  योगासने केल्याने तुमच्या मुलांना मानसिक आरामही मिळेल. वृक्षासन, भुजंगासन यासारख्या आसनांनी योगाभ्यासास सुरुवात करावी.  

पुल अप्स 

हँगिंग एक्सरसाइजमुळेही तुमच्या मुलांच्या शरीराची उंची वाढेल. शरीराची उंची वाढवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच मुलांना पुल अप्स व्यायाम करायला लावा, अन्यथा शारीरिक दुखापत होण्याची शक्यता असते. 

सायकल चालवणे 

तुमच्या मुलाची उंची वाढत नसेल तर त्यांना नियमित सायकल चालवण्यास सांगा. सायकल चालवण्यामुळे शरीराचे स्नायू व हाडे देखील मजबूत होतात. 

स्विमिंग

बहुतांश लहान मुलांना पाण्यामध्ये खेळणे खूप आवडते. तुमच्या मुलांनाही पाण्याची आवड असेल तर त्यांना स्विमिंग क्लास आपण लावू शकता. स्विमिंगमुळे शरीराचे स्नायू मजबूत होतीलच शिवाय शरीराचे पोश्चर देखील सुधारेल. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()