Passive Smoking : धूम्रपान आरोग्यासाठी धोकादायक आहे, हे आपल्याला चांगल्याने माहिती आहे. स्मोकिंग (Smoking) आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे हार्टचे आजार, स्ट्रोक, एवढंच काय तर लंग कँसर सारख्या समस्यांना आमंत्रण देते.
WHO एका रिपोर्टनुसार स्मोकिंगमुळी दररोज जवळपास 14 हजार लोकं आपला जीव गमवतात पण सिगारेट पिल्यानेच नाही तर सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीजवळ उभे राहल्यानेही आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो. यालाच पॅसिव्ह स्मोकिंग (Passive Smoking) म्हणतात. (Passive Smoking how is it affect on our health read story )
Passive Smoking काय आहे?
सिगारेट, बीडी मधून निघणारा धुर हा खूप विषारी असतो. हा विषारी धूर तुमच्या केसांमध्ये , स्किनमध्ये , कपड्यांमध्ये तर कधी रुम, कार मध्ये पसरलेला असतो. हा सिगारेटचा धूर जेव्हा बाहेर येतो तेव्हा विषारी पदार्थांसोबत मिसळून केमिकल रिअॅक्शन करतो. यानंतर हे अधिक विषारी होतं.
जरी तुम्ही स्मोकींग करत नाही तरीसुद्धा तुम्ही या विषारी धूराचे शिकार होऊ शकता. यालाच पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. यात असे केमिकल्स असतात जे आपल्या आरोग्याला खूप नुकसान पोहचवू शकतात.
प्रेग्नेंट महिलांनी विशेष काळजी घ्यावी
पॅसिव्ह स्मोकिंगचा सर्वात जास्त परिणाम हा प्रेग्नेंट महिलांवर होतो. यामुळे आईच्या गर्भात असणाऱ्या बाळावरही परिणाम होतो. एका रिसर्चमध्ये पॅसिव्ह स्मोकिंग गर्भात असणाऱ्या बाळाच्या लंग्समध्ये अडचण निर्माण करते. ज्यामुळे जन्म झाल्यानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
इम्यूनिटी कमी होते
पॅसिव्ह स्मोकिंगमुळे लहान मुलांच्या इम्यून सिस्टमवर चांगलाच प्रभाव पडतो. यामुळे अस्तमा, कानाचं इन्फेक्शन, वारंवार आजारी पडणे आणि निमोनिया सारख्या समस्या होतात. एवढंच नाही तर पॅसिव्ह स्मोकिंगमुळे किडनी डिसिजही होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.