गेल्या काही दिवसांमध्ये लग्न समारंभासारख्या मंगल कार्यात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप वाढले आहेत. मागच्या शनिवारीसुद्धा लखनऊमध्ये एका लग्नात अचानक नवरी मुलीला कार्डियाक अरेस्ट आल्याने तिचा मृत्यू झाला होता.
सध्या मंगल कार्यात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की मंगल कार्यात माणूस आनंदी असताना हार्ट अटॅक कसा काय येऊ शकतो? तज्ञांनी यामागील कारण स्पष्ट केलंय. चला तर जाणून घेऊया.
तज्ञ सांगतात, मागील काही काळात हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टचे प्रमाण वाढले. यामागे अनेक कारणे समोर आली त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोना काळात लोकांच्या जीवनमानावर झालेला प्रभाव. एवढंच काय तर काही लोकांना तर माहितीही नसतं की त्यांना हार्टची समस्या आहे. यामुळेही हार्ट अटॅकचंही प्रमाण वाढलेलं दिसून आलं.
मंगल कार्यात डीजेच्या आवाजाने हार्टवर ताण पडतो. या आवाजामुळे सिंपेथिक नर्वस सिस्टमला वायब्रेशन होतं ज्यामुळे हार्टचे ठोके वाढू लागतात अशा स्थितीत हार्ट अटॅक आणि कार्डियक अटॅक सारखा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
कोरोना काळात हृदयांशी संबंधीत आजारांचे प्रमाण अधिक वाढले आहेत. रिसर्च नुसार कोरोना व्हायरसचे संक्रमण शीरांच्या आतमधील रक्त वाहिन्यांवर सूजन निर्माण करू शकतात. ज्यामुळे हार्ट ब्लॉक होण्याची शक्यता अधिक असते आणि हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो. यातच कोव्हीड काळानंतर हार्टचे रुग्ण वाढल्याची बाबही समोर आली आहे.
अचानक हार्ट अटॅक आल्यानंतरही आपण व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. सीपीआरच्या मदतीने दोन्ही हातांनी व्यक्तीच्या छातीवर दाब दिल्याने श्वास घेण्यास मदत मिळते. असे केल्याने रुग्णाचा जीव वाचू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.