कोरोनातून बरे झालेल्यांना होतोय ब्रेन फॉग, काय आहेत लक्षणे?

कोरोनातून बरे झालेल्यांना होतोय ब्रेन फॉग, काय आहेत लक्षणे?
Updated on

Brain Fog Causes, Symptoms: कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (omiron)च्या संक्रमणादरम्यान, काही असे आजार आहेत ज्याचा परिणाम आपल्यावर होत आहे. पण त्याचा कोरोनासोबत काही संबध नाही तरीही त्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. कोरोना व्हायरसच्या दरम्यान नवीन-नवीन आजार समोर आले त्यापैकी एक ब्रेन फॉग (Brain Fog). ही कोणतीही मेडिकल टर्म नाही तर एक साधारण शब्द आहे, ज्याद्वारे मेंदुसंबधीत समस्यांबाबत सांगितले जाते, जसे स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष केंद्रित न होणे, माहिती समजूण घेण्यास अडचण येणे, थकवा येणे, इकडचे-तिकडचे विचार येणे इ. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा तुमच्यासाठी स्वत:च सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवणे अवघड होत असेल तर त्याला ब्रेन फॉग म्हणतात. सर्वसाधारणपण त्यामुळे थकवा, चिडचिडपणा आणि सुस्ती आल्याचे जाणवते.

२२ ऑक्टूबर २०२१ला हिंदुस्तान वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या रिपोर्टमधील अभ्यासानुसार, कोरोनातून बरे झालेल्या २८ टक्के लोकांना ब्रेन फॉगिग, थकान आणि एकाग्रताची समस्या जाणवत आहे.

काय आहेत ब्रेन फॉगचे लक्षण? (What Are the Symptoms of Brain Fog)

दिल्लीतील उजाला सिग्नस हॉस्पिटलचे (Ujala Cygnus Hospital) अधिकारी डॉ. शुचिन बजाज(Shuchin Bajaj) यांनी हिंदुस्थानला दिलेल्या मुलाखत रिपोर्टनुसार, ब्रेन फॉगमुळे व्यक्तीचा वागण्यामध्ये खूप वेगात बदल येतो. असे लोकांना नेहमी थकवा झालेला असतो. कोणत्याही कामामध्ये मन न लागणे, चिडचिडपणा, डिप्रेशन, आपल्या आवडीचे काम करण्यासाठी देखील उत्साह नसणे, सतत डोके दुखणे, झोप न येणे आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरून जाण्यासारखे लक्षण पाहायला मिळणे. डॉक्टर रक्ततपासणीमध्ये हा आजार शोधू शकतात . जसे की शुगर किंवा थायरॉईड अनबॅलन्स, किडनी इ. फंक्शन योग्य पद्धतीने होत नसेल किंवा कोणत्याही संक्रमण होणे, किंवा शरीरामधील पोषक तत्वांमध्ये कमी देखील ब्रेन फॉगचे लक्षण दिसून येते.

ब्रेन फॉगपासून वाचण्यासाठी काय सावधगिरी बाळगावी

  • आपल्या डाएटमध्ये अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड नियमितपणे समाविष्ठ करणे.

  • दुपारच्या वेळी कॅफिनयुक्त पेय घेऊ नका

  • मद्यपान आणि धुम्रपान टाळा

  • रोज १५ मिनिट ऊन घ्या.

  • नियमित व्यायाम करा.

  • लक्षणांच्या आधारे डॉक्टर एक्सरे सिटी स्कॅन, एमआरआय एलर्जी टेस्ट इंत्यादी चा सल्ला देऊ शकतात

  • काही प्रकरणांमध्ये औषधांसोबत थेरपी देखील या समस्यांचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()