देशाला दोन वर्ष कोरोनाच्या संक्रमणाने ग्रासलं होतं. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. या दोन वर्षाच्या काळामध्ये लाखो लोकांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाची लागण झाल्याने अनेकांनी प्राण गमावले तर. अनेकजण कोरोनाशी Corona दोन हात करत पुन्हा बरे झाले. मात्र कोरोना वायरसच्या Virus संक्रमणादरम्यान आणि नंतरही रुग्णांना अनेक प्रकारच्या शारिरीक समस्या निर्माण झाल्या. Post Corona Hearing loss Problems
कोरोना संक्रमणा दरम्यान रुग्णांना काही गंभीर आजारांची Illnessलागण झाल्याचं पाहायला मिळालं. तर काहींमध्ये दीर्घ कालावधीसाठी कोरोनाची Corona लक्षण आढळून आल्याने त्यांना या काळात आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस हृदय, फुफ्फुस आणि मेंदूच्या क्षमतेवर परिणाम करून त्याच्याशी संबंधित आजार वाढवू शकतो हे आतापर्यंतच्या अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे.
तर नुकत्याच झालेल्या एका संशोधनात शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही Hearing Capacity परिणाम करत आहे. यामुळे या समस्येकडे गांभिर्याने पाहणं गरजेचं आहे. एका अभ्यासानुसार, COVID-19 संसर्गामुळे सौम्य लक्षणे असलेल्या लोकांमध्येही अचानक बहिरेपणा किंवा श्रवण कमी होण्याचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण होवू शकते असा तर्क मांडण्यात आला आहे. coronavirus can cause sudden hearing loss
संशोधकांच्या मते सडन सेंसरिनुरल हियरिंग लॉस (SSNHL) म्हणजेच अचानक आलेलं बहिरेपण हे कोव्हिड-१९ चा साईड इफेक्ट असू शकतो. मात्र अद्याप यावर सखोल अभ्यास झालेला नाही. हे लक्षण अनेक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिसून आलं असलं तरी अद्याप याची कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये नोंद करण्यात आलेली नाही. sudden hearing loss
हे देखिल पहा-
रुग्णाचा अनुभव
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला असून यात दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील नर्सिंग लेक्चरर किम गिब्सन यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. २०२२ सालामध्ये गिब्सन यांना सौम्य लक्षण असलेल्या कोरोनाची लागण झाली होती. यातून त्या काही दिवसात बऱ्या झाल्या. यानंतर मात्र त्यांना चक्कर येई लागली. तसचं त्यांना टिनिटस म्हणजेच कान वाजणे आणि एका कानातून कमी ऐकू येवू लागलं.
तपासादरम्यान, डॉक्टरांनी श्रवणशक्ती कमी झाल्याची सांगितलं आणि त्यासाठी कोरोना विषाणू संसर्ग हे कारण असल्याचं मानलं गेलं.
कोव्हिड-१९ चे दुष्परिणाम
गिब्सन यांना डॉक्टरांनी त्वरित काही औषध दिली. या औषधोपचारांनंतर गिब्सन यांना हळू हळू योग्य ऐकू येऊ लागलं. मात्र त्यांची कान वाजण्याची समस्या कायम राहिली. गिब्सन यांच्या मते कोरोनाचे अल्पकालिन आणि दिर्घकालिन परिणाम अजूनही दिसून येत आहेत. यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. यामुळे काही लक्षणांकडे गांभिर्याने पाहणं गरजेचं आहे. coronavirus can cause sudden hearing loss
संसर्ग आणि लसीकरणाचे दुष्परिणाम
रॉयल ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ जनरल हेल्थ तज्ञांच्या मते, SSNHL हे खास करून अचानक कमी ऐकू येण्याच्या समस्येसाठी ओळखलं जातं. साधारणपणे याची सुरुवात एका कानाने होते. सुरुवातीला एका कानाने कमी एकू येतं.
हे देखिल वाचा-
मागील काही अभ्यासांमध्ये देखील SSNHL चा COVID-19 शी तसेच COVID लसीकरणाच्या दुष्परिणामांशी संबध जोडण्यात आला आहे. मात्र जागतिक स्तरावर अद्याप हे ठोस सिद्ध झालेलं नाही की कोरोनामुळे ऐकण्याची क्षमता कमी होवू शकते.
गिब्सन यांच्या मते तर ज्यांना कोरोनाच्या संसर्गा दरम्यान कोणताही त्रास किंवा लक्षण दिसून आली नव्हती त्यांना दिर्घकाळातमध्ये काही समस्यांचा धोका निर्माण होणं नाकारता येत नाही.
अद्याप यावर संशोधन सुरू असलं तरी कोरोनामुळे हृदया, फुफ्फुस, मानसिक आरोग्यासोबतच कानांवर किंवा ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होवू शकतो हे ध्यानात घेऊन काळजी घेणं आता गरजेचं आहे. यामुळे कोरोनाची लागण होत असलेल्या रुग्णांनी या लक्षणांकडे गाभिर्याने पाहणं गरजेचं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.