Ashtagandha : अष्टगंध लावल्याने मेंदुला मिळते शीतलता

मंगल कार्यामध्ये महत्त्व, आठ प्रकारच्या वस्तूंपासून होते तयार
Ashtagandha
Ashtagandhasakal
Updated on

- प्रशांत खुरपडे

नागपूर : विविध सण उत्सवात अष्टगंधाशिवाय पानही हलत नाही. विशेषतः मंदिरांमध्ये भगवान शंकराच्या पिंडीला, विठ्ठलाच्या माथी, देवादिकांच्या मूर्तीला अष्टगंधाचा टिळा लावला जातो. याचा टिळा माथ्यावर लावल्याने मेंदुला शीतलता मिळते. मनशांत राहते, असे पूजाविधी करणारे पंडित सांगतात.

हळद कुंकू आणि चंदनाप्रमाणे हिंदू धर्मात पूजा विधीमध्ये अष्टगंधाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरी ते पूजा साहित्यामध्ये ते दिसते. काही जण त्याचा वापर दररोज कपाळावर लावण्यासाठीसुद्धा करतात. यामुळे उष्ण प्रकृती असणाऱ्यांना याचा लेप लावला जातो. आयुर्वेदातही अष्टगंधाला औषधोपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. कर्मकांडात याचा अधिक उपयोग होतो.

अष्टगंधाचे जीवनात तसे फार महत्त्वाचे स्थान आहे. घरात, मंदिरात, पूजा करताना, श्राद्धविधी, लग्न कार्य व साक्षगंधाच्या विधीमध्येही त्याचा उपयोग होतो. अष्टगंध तसे पाहिले तर पूर्वी चंदनाचे खोड पारिसावर घासून ते तयार केले जात असे. पण आता तयार असे अष्टगंध डबीमध्ये मिळते.

विशेष म्हणजे चंदनाचे खोड पारिसावर घासून अष्टगंध तयार करताना हातांचा व कंबरेचा व्यायामही होतो. त्याचा आरोग्याला लाभ होतो. असेही मानले जाते. आता तर अष्टगंधापेक्षा गोपीचंदनाचा वापर अधिक होताना दिसतो. कारण ते सहज व स्वस्तात उपलब्ध होते. द्वारकेजवळील पहाडातून त्याची निर्मिती होते. भगवान श्रीकृष्णाचे पाय या पहाडाला लागल्याने त्याला गोपीचंदन म्हटले जाते. अशी अख्ययिका आहे. गोपीचंदन तयार करताना त्यात तुळशीची माती व गंगेच्या मातीचा उपयोग केला जातो. अनेकजण गोपीचंदनाला अष्टगंध मानून उपयोग करतात.

कसे तयार होते अष्टगंध

आठ प्रकारच्या वस्तुंपासून अष्टगंधाची निर्मिती केली जाते. कुंकू, आरारोट, कस्तुरी, लवंग, केशर, चंदन,कापूर, तुळशी यापासून ते तयार होते. या आठही वस्तूंना पूजा विधीमध्ये महत्वाचे स्थान असते. मंदिर व घरांमध्ये अष्टगंध तयार करणे सध्याच्या काळात किचकट झाले आहे.

टिळा लावल्याने वाढते मनाची एकाग्रता

अष्टगंध कपाळावर लावल्याने मनाची एकाग्रता वाढते. बुद्धीचा विकास होतो. असेही काही जण मानतात. आधी महिलासुद्धा कुंकू लावताना मेणाचा उपयोग करीत असे. थंड असल्याने अष्टगंधाचा वापर करताना अनेक जण दिसतात. पण काहींना अष्टगंध लावल्याने एलर्जीचा त्रास होऊ शकतो. हे लक्षात ठेवूनच त्याचा उपयोग व्हावा.

देवाला अष्टगंध लावताना अनामिका बोटाने लावावे. तर स्वतःला लावताना मध्यमाचा उपयोग करावा. श्राद्धविधी करताना तर्जनीचा उपयोग करावा. भजन-पूजन करताना अंगठ्याने बुक्का लावावा. तर गुरूंना करंगळीने अष्टगंध लावावे. लग्कार्यात नवरदेवाला दोन बोटांनी गंध लावले जाते. नवरदेवाच्या कपाळावरील गंध हे रिद्धी - सिद्धीचे प्रतीक मानले जाते.पण अनेकदा मध्यमानेच देवाच्या प्रतिमेला अष्टगंध लावताना अनेक जण दिसतात. पण असे करू नये. याबाबतचे नियम पाळावे.

-शिरीष पटवर्धन गुरूजी,पुरोहित नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.