Workplace Asthma : ऑफीसमधला AC ठरू शकतो दम्याला कारणीभूत

१५% ते ३३% प्रौढांमध्ये कामाशी संबंधित कारणांमुळे दम्याचा विकार झालेला असतो.
Workplace Asthma
Workplace Asthmagoogle
Updated on

मुंबई : आधुनिक जीवनशैलीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे श्वसनविकारांचे प्रमाणही वाढत आहे. परंतु, कामाच्या ठिकाणी सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अनेक घटकांमुळे श्वसनविकार होऊ शकतात. त्यामुळे कार्यालयाच्या ठिकाणी एसी ऑफीसमध्ये काम करताना अस्थमा विकार असलेल्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

‘‘दमा हा एक विकार आहे जो तुमच्या वायुमार्गाला नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. तुमच्या नोकरीच्या परिणामी अस्थमा विकसित होतो तेव्हा कामाशी संबंधित अस्थमाचे निदान केले जाते. (precautions for asthma at workplace AC in office can be a reason for asthma )

१५% ते ३३% प्रौढांमध्ये कामाशी संबंधित कारणांमुळे दम्याचा विकार झालेला असतो. कामाशी संबंधित दमा तेव्हा होतो जेव्हा आधीच अस्तित्वात असलेला दमा कामाच्या ठिकाणी रसायनांच्या संपर्कात आल्याने त्रास होतो.’’ याबद्दल सांगत आहेत अपोलो स्पेक्ट्राच्या जनरल फिजिशियन डॉ. छाया वजा. हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Workplace Asthma
Constipation Remedies : उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेपासून आराम देतील हे उपाय

अलिकडच्या वर्षांत वायू प्रदूषण ही जगभरातील सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः भारतात याचं प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. ज्यात जगातील शीर्ष वीस प्रदूषित शहरांपैकी तीन शहरे आहेत आणि तेथे वायू प्रदूषणामुळे दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.

ग्रीनपीस इंडियाच्या अहवालानुसार, भारतातील ९९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला हवेच्या संपर्कात येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या पीएम २.५ साठी आरोग्य-आधारित मानकांपेक्षा जास्त आहे.

''कामाशी संबंधित दम्याचा त्रास आहे की नाही हे पाहण्यासाठी दम्याची लक्षणं दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय चाचणी करणं गरजेचं आहे. वारंवार खोकला, छाती भरून येणं, धाप लागणं आणि श्वास घेताना त्रास जाणवणं ही दम्याची प्राथमिक लक्षणं आहेत.

दगड आणि कोळसा खाणीत काम करणाऱ्या माणसांपासून कापडगिरण्या, इलेक्ट्रिक रिपेअर, औषधउद्योग, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या व्यावसायिक फुप्फुसरोगांना सामोरे जावे लागू शकते. सिलिकॉन, अॅस्बेस्टॉस, कापडाचे तंतू, आदी घटक सातत्याने श्वसनात आल्याने श्वसनसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

सेंट्रलाइज्ड पद्धतीच्या एसीमुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना श्वसनविकार मोठ्या प्रमाणात होतात. अशा कार्यालयातील अनेकांना सर्दी होणे, शिंका येणे, खोकला येणे, डोके दुखणे आणि श्वसनविकाराशी झगडत असलेल्यांना दम्याचा वारंवार त्रास होतो.''

‘‘व्यावसायिक दमा १०% ते २५% दमा असलेल्या व्यक्तींना प्रभावित करतो. ऑक्युपेशनल अस्थमा हा एक प्रकारचा दमा आहे जो इनहेल्ड इरिटेंट्सच्या व्यावसायिक प्रदर्शनामुळे होतो. व्यावसायिक दमा हा वारंवार उलटता येण्याजोगा असतो.

Workplace Asthma
Lungs Health : नुसती सिगारेट सोडली म्हणजे झालं नाही फुप्फुसांचं आरोग्यही सुधारा

दमा हा आजार आनुवांशिकतेने होऊ शकतो. जर कुटुंबात कोणाला दमा असेल तर पुढच्या पिढीलाही दमा होऊ शकतो. काही रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्यांना तेथील वायू आणि रासायनिक द्रव्ये यामुळे दमा होऊ शकतो. दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळेही दमा असलेल्या लोकांना त्रास होतो.''

‘‘कामाच्या ठिकाणी अॅलर्जी आणि त्रासदायक घटकांचा संपर्क कमी करण्यासाठी, सुरक्षित आणि निरोगी कामाचे वातावरण तयार करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

कामाच्या ठिकाणाप्रमाणे योग्य फेस मास्क, एअर फिल्टर आणि योग्य वेंटिलेशनचा वापर, दम्याचे लवकर निदान करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि रोजगारापूर्वीची तपासणी यामुळे कामाच्या ठिकाणी एक्सपोजर कमी केले जाऊ शकते.''

‘‘प्राणायाम, ध्यानधारणा, योगामुळे आणि मनशांतीच्या व्यायामामुळे दमा नियंत्रित होऊ शकतो. श्वास रोखून धरण्याच्या पद्धती मानसिक तणावावर मात करतात. त्यामुळे दमा असणाऱ्या रुग्णाने घाबरण्याचे कारण नाही.

दम्याचे लवकर निदान झाल्यास लवकर उपचार होऊ शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणे आणि लवकरात लवकर उपचार करणे, योग्य ठरेल. आपले वजन नियंत्रित ठेवणे, धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल करून आपल्याला दमा नियंत्रित करता येतो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.