Pregnancy Healthy Foods: गरोदरपणात हे अन्नपदार्थ आरोग्यासाठी असतात सकस

गरोदरपणात महिलांना सतत काही वेळेनंतर भूक लागत राहते.
Pregnancy Healthy Foods
Pregnancy Healthy FoodsEsakal
Updated on

गरोदरपणात महिलांना सतत काही वेळानंतर भूक लागत राहते. अशा परिस्थितीत,पोटात बाळ असलेली आई तिची भूक शांत करण्यासाठी चुकीचे अन्न पदार्थ खाऊन टाकते. पण गरोदरपणाच्या काळाण पोटात बाळ असलेल्या आईने हेल्दी अन्न पदार्थाचे सेवन करणे खुप महत्वाचे असते. अशा गोष्टी खाणे हे पोटात वाढणाऱ्या बाळाच्या आणि आई दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. चला तर मग बघू या कोणते आहेत ते हेल्दी पदार्थ...

Pregnancy Healthy Foods
Pregnancy: ना गर्भनिरोधक गोळ्या, ना कंडोम! 'या' नैसर्गिक मार्गाने टाळू शकता गर्भधारणा

● ताक

जर तुम्हाला गरोदरपणात उलट्यांचा त्रास होत असेल तर तुमची भूक शांत करण्यासाठी काहीतरी थंड आणि चवदार खाण्याचा पर्याय वापरून पाहू शकता. यासाठी तुम्ही ताक पिऊ शकता. या आरोग्यदायी पदार्थात कॅल्शियम भरपूर असते, जे मुलांच्या हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. याव्यतिरिक्त, हे प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे.

● उकडलेले अंडे

गरोदर महिलांसाठी उकडलेले अंडे हा स्नॅकचा एक चांगला पर्याय आहे. उकडलेले अंडे हे केवळ तुमची पोटातील भूक तर भागवतात सोबत ऊर्जा देखील देतात. अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने ,कोलीन असते. या दोन्ही गोष्टी गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदूसाठी चांगल्या असतात. तुम्ही ही अंडी बटरमध्ये फ्राय करुन देखील खाऊ शकता.

● अक्रोड

गर्भधारणेदरम्यान गर्भवती महिलांसाठी अक्रोड खूप चांगले आहे कारण त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात जे न जन्मलेल्या मुलाच्या मानसिक विकासासाठी चांगले असतात. अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर, निरोगी चरबी आणि खनिजे असतात. अक्रोड हे स्नायूंसाठी देखील चांगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.