तर काय?

मी २९ वर्षांची असून, सात महिन्यांची गरोदर आहे. गेल्या १०-१५ दिवसांत माझी त्वचा काळवंडली आहे, त्वचेवर काळ डाग दिसायला लागले आहेत.
pregnant women children
pregnant women childrensakal
Updated on

प्रश्‍न १ - मी २९ वर्षांची असून, सात महिन्यांची गरोदर आहे. गेल्या १०-१५ दिवसांत माझी त्वचा काळवंडली आहे, त्वचेवर काळ डाग दिसायला लागले आहेत. शरीरात गर्मी जाणवते आहे. यासाठी काही आयुर्वेदिक औषध घेता येतील का?

- प्राजक्ता काजळे, पुणे

उत्तर - गरोदरपणात शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्सच्या बदलामुळे बऱ्याचदा अशा प्रकारचे त्वचेचे विकार होताना दिसतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच पित्तसंतुलनासाठी गर्भसंस्कारांच्या उपचारांमध्ये आपण संतुलन पित्तशांती या गोळ्यांचा समावेश करत असतो. आहाराची काळजी कशी घ्यावी याचे आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तकात व डॉ. मालविका तांबे यू-ट्यूब चॅनेलवर केलेले आहाराबद्दलचे संपूर्ण मार्गदर्शन आपण पाहू शकता. संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे सुरू करावे.

संतुलन गुलकंद स्पेशल, संतुलनच्या मंजिष्ठासॅन या गोळ्या तसेच संतुलन पित्तशांती गोळ्या नियमितपणे घेणे सुरू करावे. उन्हाळा सुरू असला तरी दूध व फळे एकत्र केलेली मिल्कशेकस्, आइस्क्रीम्स घेऊ नयेत. तसेच आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ आहारातून टाळणे इष्ट राहील. जमत असल्यास संतुलनच्या कुठल्याही केंद्रातून सेफ स्पेशालिटस्टचे मार्गदर्शन घ्यावे, यामुळे प्रकृतीनुरूप औषधे व रसायने यांची योजना करणे शक्य होऊ शकेल.

प्रश्‍न २ - माझा मुलगा सव्वा वर्षाचा आहे. पहिले आठ महिने त्याची तब्येत एकदम व्यवस्थित होती. त्यानंतर सध्या त्याला सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होतो आहे. डॉक्टरांकडे नेले असता बाळदमा असल्याचे निदान झालेले आहे. सतत औषधे घ्यावी लागत असल्याने तो चिडचिड करतो. मी त्याला पहिले सहा महिने संतुलन बालामृत व बाळगुटी दिलेले आहे. पण तरीही तो इतका आजारी का पडतो हे समजत नाही. कृपया उपाय सुचवावे.

- दीपाली भरड, जुन्नर

उत्तर - संतुलन बालामृत व संतुलन बाळगुटी या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी मदत करतात. शक्यतो संतुलन बाळगुटी दीड वर्षापर्यंत व संतुलन बालामृत पाच वर्षांपर्यंत सुरू ठेवणे उत्तम असते. तुम्ही या दोन्ही गोष्टी बंद केल्या आहेत, त्या परत चालू कराव्यात. तसेच सर्दी-खोकला-ताप हा त्रास वारंवार होत असला तर संतुलनचे सीतोपलादी चूर्ण बाळाला वरचेवर मधात मिसळून देणे सुरू करावे.

संतुलन ब्राँकोसॅन कफ सिरप देणेही उत्तम. रुईच्या पानांना तेल लावून, पाने कोमट करून त्याची छाती शेकावी. रुईच्या पानांचा त्वचेला स्पर्श होण्यापेक्षा एखादे पातळ कापड छातीवर ठेवून शेक करावा. लहान मुलांच्या कुठल्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार घेणे चांगले असते. त्यामुळे तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन उपचार सुरू केले तर त्याला लवकर बरे वाटायला मदत मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.