Preterm Babies : वेळेआधीच मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले; भारतातील परिस्थितीही चिंता वाढविणारी

युद्ध, तापमानवाढीमुळे जगभरात ‘ती’ची होते घुसमट
Premature births increased India preterm babies Premature Birth Complications Management  Causes
Premature births increased India preterm babies Premature Birth Complications Management Causesesakal
Updated on

केपटाऊन : जगभरामध्ये २०२० मध्ये १३.४ दशलक्ष अर्भकांचा वेळेच्या आधीच जन्म झाला असून त्यातील ४५ टक्के अर्भके ही फक्त पाच देशांमध्ये जन्मली असून त्यात भारत, चीन आणि पाकिस्तानचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. ‘बॉर्न टू सून ः डिकेड ऑफ अॅक्शन ऑन प्रिटर्म बर्थ’ नावाच्या अहवालामध्ये उपरोक्त बाब नमूद करण्यात आली आहे.

जगभरातील ४६ देशांतील १४० तज्ज्ञ या संशोधनामध्ये सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ), युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) आणि दि पार्टनरशिप फॉर मॅटर्नल, न्यूबॉर्न अँड चाइल्ड हेल्थ या संघटनांच्या आघाडीने याबाबतचा अभ्यास केला होता. युद्ध, जागतिक तापमानवाढ, कोरोना आणि जीवनमान महागल्याने याचा विपरित परिणाम महिला आणि मुलांच्या स्वास्थ्यावर होत असल्याचे दिसून आले.

वेळेच्या आधीच मुलांचा जन्म होण्याच्या प्रकाराला अभ्यासकांनी ‘सायलेंट इमर्जन्सी’ असे संबोधले असून याचा परिणाम मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या आयुर्मानावर होत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक पातळीवर २०२० मध्ये मुले वेळेआधीच जन्माला येण्याचा दर ९.९ टक्क्यांवर आला असून २०१० मध्ये तो ९.८ टक्के एवढा होता असे या अहवालात म्हटले आहे. २०२० मध्ये १३.४ दशलक्ष मुलांचा वेळेआधीच जन्म झाला त्यानंतर आरोग्यविषयक गुंतागुंती निर्माण झाल्याने तब्बल दहा लाख (१ दशलक्ष) मुलांचा मृत्यू झाला. त्यावेळी दहापैकी एक बाळ मरण पावत होते.

अशीही भीषण स्थिती

बांगलादेशमध्ये वेळेआधीच मुल जन्माला येण्याचे प्रमाण १६.२ टक्के, मालावीत १४.५ टक्के आणि पाकिस्तानात १४.४ टक्के एवढे असल्याचे आढळून आले आहे. ग्रीस (११.६ टक्के) आणि अमेरिका (१०.० टक्के) या उच्च उत्पन्न असलेल्या देशांतील प्रमाण देखील चिंताजनक असल्याचे आढळून आले आहे. जागतिक पातळीवरील प्रमाणाशी तुलना करता वेळेआधीच जन्माला येणारी जवळपास अर्धा टक्के (४५ टक्के) मुले ही भारत, पाकिस्तान, नायजेरिया, चीन आणि इथिओपिया या पाच देशांतील असल्याचे आढळून आले आहे.

तातडीने उपाययोजना हव्यात

अंतर्गत संघर्ष, जागतिक तापमानवाढ, कोरोना संसर्ग आणि जीवनमान महागल्याचा मोठा फटका महिला आणि मुलांना बसल्याचे आढळून आले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर वायू प्रदूषणामुळे दरवर्षी साठ लाख मुले वेळेच्या आधीच जन्माला येतात. सध्या मानवी संघर्ष तीव्र असलेल्या दहा देशांत जन्माला येणारे दहा पैकी एक मुल हे मुदतीआधीच जन्माला येत असल्याचे आढळून आले आहे. महिला आणि मुलांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेता याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

त्यातही भारताचा समावेश

जागतिक पातळीवरील माता मृत्यूमध्ये ज्या दहा आघाडीच्या देशांचा वाटा हा साठ टक्के एवढा आहे त्यात भारताचा देखील समावेश असल्याची माहितीसमोर आली आहे. मरण पावलेले बाळ जन्माला येणे आणि नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे. सब- सहारा आफ्रिका, मध्य आणि दक्षिण आशिया या भागामध्ये अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.