माझी मुलगी चार वर्षांची आहे. तिला धुळीची ॲलर्जी आहे. तिला थोडे बाहेर नेले, शाळेत पीटीचा तास असला की रात्री नक्की खोकला येतो. मी तिला वाफारा देते, अनेकदा आयुर्वेदिक वा ॲलोपॅथिक औषधही देते. परंतु म्हणावा तसा फरक पडत नाही. कृपया उपचार सुचवावे....
- सौ. अमृता, पुणे
उत्तर – बऱ्याच लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास साधारण ५-६ वर्षांपर्यंत होताना दिसतो. पण धुळीच्या ॲलर्जीमुळे खोकला येत असला तर फक्त खोकल्यावरचे उपचार पुरेसे नसतात. यासाठी तिची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. तिला नियमितपणे संतुलन बालामृत देणे सुरू करावे. शक्य झाल्यास संतुलन अमृतशर्करा घालून पंचामृतही द्यावे. सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा सॅन रोझ देण्याने तिची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होईल. रोज पाव चमचा संतुलन सितोपलादी चूर्ण मधात मिसळून द्यावे. तसेच खोकला झाल्यावर ब्रॉँकसॅन कफ सिरप देण्याचा फायदा होऊ शकेल. खोकला झाल्यावर संतुलन अभ्यंग कोकोनट सिद्ध तेल छातीला लावून नंतर रुईच्या पानांनी छाती शेकावी.